Published On : Thu, May 28th, 2026
By Nagpur Today Nagpur News

टेरेसवर मित्राचा दगडाने खून; आरोपी 24 तासांत पोलिसांच्या ताब्यात

Advertisement

नागपूर : कळमना परिसरात पहाटेच्या सुमारास घडलेल्या थरारक हत्याकांडाने परिसर हादरला आहे. एकत्र जेवण करून टेरेसवर झोपायला गेलेल्या दोन मित्रांमध्ये झालेला वाद इतका विकोपाला गेला की, एका तरुणाने दुसऱ्याच्या डोक्यात दगड घालून त्याची निर्घृण हत्या केली. या प्रकरणात कळमना पोलिसांनी अवघ्या 24 तासांच्या आत आरोपीला ताब्यात घेत पुढील कारवाई सुरू केली आहे.

मृतक दीपक उर्फ भोला भुजबल चंद्रलेख (22, रा. विजयनगर, कळमना) आणि आरोपी अमोल लक्ष्मण वाघमारे (31, रा. हनुमान मंदिराजवळ, कळमना गाव) हे दोघेही मानसिकदृष्ट्या अस्थिर असल्याची माहिती समोर आली आहे. दोघे नेहमी एकत्र फिरत असत. बुधवारी रात्री त्यांनी आरोपीच्या घरी एकत्र जेवण केले. त्यानंतर दोघे घराच्या टेरेसवर झोपण्यासाठी गेले.

पहाटेच्या सुमारास त्यांच्यात जोरदार वाद झाला. संतापाच्या भरात अमोल वाघमारे याने टेरेसवर पडलेल्या दगडाने दीपकच्या डोक्यावर वार केले. गंभीर जखमी झालेल्या दीपकचा जागीच मृत्यू झाला. रक्ताच्या थारोळ्यात पडलेला मृतदेह पाहून परिसरात खळबळ उडाली.

Gold Rate
July 20 ,2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 1 42,400 /-
Gold 22 KT ₹ 1,32,100 /-
Silver/Kg ₹ 2,20,400/-
Platinum ₹ 88,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

घटनेची माहिती मिळताच कळमना पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत तपासाची चक्रे फिरवली. पोलिसांनी संशयित अमोल वाघमारे याला ताब्यात घेतले असून त्याच्याकडून सखोल चौकशी सुरू आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

Advertisement
Advertisement
nagpur student protest delhi lathi charge

nagpur student protest delhi lathi charge

प्लेट हटाने को कहा तो भड़के पड़ोसी! #NagpurNews  #CrimeNews  #LatestNews #news #Attack #newsupdate

प्लेट हटाने को कहा तो भड़के पड़ोसी! #NagpurNews #CrimeNews #LatestNews #news #Attack...

चाकू की नोक पर लूटपाट! #NagpurNews  #CrimeNews #LatestNews #NewsUpdate #Police #KnifeAttack #Robbery

चाकू की नोक पर लूटपाट! #NagpurNews #CrimeNews #LatestNews #NewsUpdate #Police #KnifeAttack #Robbery

लकड़गंज में दिनदहाड़े चोरी की कोशिश नाकाम #NagpurNews #Crime #Theft #Chor #HindiNews #newsupdate

लकड़गंज में दिनदहाड़े चोरी की कोशिश नाकाम #NagpurNews #Crime #Theft #Chor #HindiNews...

कन्हान में नशे की ‘काली दुकान’ पर पुलिस का छापा! #NagpurNews #Drug #NDPS #Crime #latestnews #news

कन्हान में नशे की ‘काली दुकान’ पर पुलिस का छापा! #NagpurNews #Drug...

नागपुर में अन्ना गैंग का आतंक! NagpurNews #AnnaGang #Theft #Crime  #CCTV #LatestNews #newsupdate

नागपुर में अन्ना गैंग का आतंक! NagpurNews #AnnaGang #Theft #Crime #CCTV #LatestNews...

GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges