Published On : Thu, May 28th, 2026
By Nagpur Today Nagpur News

नागपुरात उष्णतेचा कहर कायम; उद्या विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा

Advertisement

नागपूर -हवामान विभागाने शुक्रवार (29 मे) साठी दिलासा देणारा अंदाज वर्तवला आहे. नागपुरात उद्या विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता असून ताशी 40 ते 50 किमी वेगाने जोरदार वारे वाहू शकतात.

गेल्या काही दिवसांपासून नागपूरकर उकाड्याने हैराण झाले आहेत. गुरुवारी शहरात तब्बल 45.7 अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. त्यामुळे दुपारच्या वेळेत रस्त्यांवर शुकशुकाट पाहायला मिळत आहे. वाढत्या तापमानामुळे नागरिकांच्या आरोग्याच्या समस्या वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, हवामान विभागाने नागपूरसह विदर्भातील अमरावती, वर्धा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, बुलढाणा आणि यवतमाळ जिल्ह्यांसाठी मेघगर्जना आणि वादळी वाऱ्याचा अलर्ट जारी केला आहे. अचानक हवामान बदलण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी आवश्यक खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Gold Rate
Sept 07 ,2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 1 53,000 /-
Gold 22 KT ₹ 1,41,900 /-
Silver/Kg ₹ 2,33,500/-
Platinum ₹ 88,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

हवामान तज्ज्ञांच्या मते, विदर्भात सध्या उष्णतेसोबतच वातावरणात आर्द्रता वाढत असल्याने पुढील दोन दिवसांत काही भागांत पावसाची शक्यता अधिक आहे. तसेच दक्षिण-पश्चिम मान्सूनच्या प्रगतीलाही वेग मिळत असल्याचे संकेत आहेत.

Advertisement
Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges

Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.