Published On : Tue, Aug 17th, 2021

पोलीस आयुक्त यांचा ठवकर परिवाराला तात्पुरता दिलासा,

Advertisement

डी.सी.पी.ट्राफिक कार्यालयात पत्नीला अंशकालीन कमर्चारी म्हणून नोकरी ठवकर कुटुंबीयांनी मानले आ.कृष्णा खोपडे यांचे आभार

नागपूर : पारडी येथे पोलीस मारहाणीत मृत पावलेल्या स्व.मनोज ठवकर यांच्या परिवाराला न्याय मिळवून देण्यासाठी नुकतेच पोलीस आयुक्त कार्यालयात आ.कृष्णा खोपडे यांनी ठवकर कुटुंबियांसह जाऊन निवेदन दिले. विलंब होत असल्यामुळे लवकरात लवकर ठवकर यांच्या पत्नीला तात्पुरत्या स्वरुपात कां होईना, नोकरी देण्यात यावी, अशी मागणी केली होती. पोलीस आयुक्त यांनी निवेदनाच्या अनुषंगाने तात्काळ कारवाई करीत स्व.मनोज ठवकर यांची पत्नी अश्विनी मनोज ठवकर हिला डी.सी.पी. ट्राफिक कार्यालयात डेली वेजेस वर अंशकालीन कमर्चारी म्हणून नोकरी देण्याचे मान्य केले व तसे आदेश देखील पोलीस आयुक्त कार्यालयातून काढण्यात आले. आदेश प्राप्त होताच श्रीमती.ठवकर कामावर रुजू देखील झाल्या. ठवकर कुटुंबीयांना न्याय मिळवून दिल्याबद्दल आमदार कृष्णा खोपडे यांनी पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांचे आभार मानले.

आमदार कृष्णा खोपडे यांनी सांगितले की, पोलीस आयुक्त स्तरावर जरी ठवकर कुटुंबियाला न्याय मिळाला असेल, तरी शासन स्तरावर या परिवाराला मदत मिळावी यासाठी पोलीस आयुक्तांनी स्थायी नोकरी व आर्थिक मदतीसाठी प्रस्ताव शासनाकडे पाठवावा. यासंदर्भात राज्याचे मुख्यमंत्री व गृहमंत्री यांचेसोबत चर्चा देखील झाली असून लवकरच याबाबत सकारात्मक कारवाई होईल, अशी अपेक्षा आमदार कृष्णा खोपडे यांनी व्यक्त केली.

ठवकर कुटुंबियांना न्याय मिळावा, यासाठी स्थानिक नगरसेवक दिपक वाडीभस्मे, वैशाली रोहणकर, जयश्री रारोकर, देवेंद्र मेहर, संजय मानकर, देवेंद्र बिसेन, राजू दिवटे, कपिल लेंडे, अनिल कोडापे, पिंटू टिचकुले, संगिता गुप्ता, रितेश राठे, अशोक शिवहरे, बंडू फेद्देवार, मुन्ना पटले, विकास मिश्रा, मीरा सोनवानी, आशु ठाकरे, प्र