Published On : Mon, Dec 31st, 2018

खेडी येथे भागवत सप्ताहाची सांगता

Advertisement

कन्हान : – पासून ७ किलोमीटर अंतरावर खेडी (खोपडी) येथील सार्वजनिक दत्त व हनुमान देवस्थानांत भागवत सप्ताह ची सांगता महाप्रसादाने करण्यात आली. दि. १६ ते २३ डिसेंबर पर्यंत कार्यक्रमांची रेलचेल होती.वाणी भुषण ह.भ.प.श्री सोपानकाका पारवे (गुरुजी )पंढरपुर यांनी भगवंत कथा प्रवचन केले. कार्यक्रमाला हरिकीर्तन किर्तनकार आशिष महाराज चटप आळंदी, परसराम महाराज कळंबे नरखेड, राजेन्द्र महाराज वक्ते शेगाव, वसंत महाराज पोपटे रामाकोना, पांडुरंग महाराज बारापात्रे धापेवाडा, मारोतराव महाराज देवी सौसर,सप्ताहाच्या शेवटच्या दिवशी शोभायात्रा काढण्यात आली.

अवघी खेडी विठ्ठल नामाच्या जयघोषामध्ये रंगुन गेली. गावातील अनेक भागामध्ये शोभायात्रेवर फुलांचा वर्षाव करून स्वागत करण्यात आले. महिलानी शोभायात्रेच्या मार्गावर रांगोळया काढुन सुध्दा स्वागत करण्यात आले .गोपाल काल्याचे किर्तन रत्नाकर महाराज खाडे वाडेगाव पाढुर्णा यांच्या हस्ते करण्यात आले असुन गोपाल काल्यां व महाप्रसादाचे वितरण करुण भागवत सप्ताहाची सांगता करण्यात आली.

कार्यक्रमाच्या यशस्वीते करिता श्री सदगुरु भजन मंडळ रामटेक, दुर्गा महिला भजन मंडळ पिपळा बखारी, शारदा महिला भजन मंडळ साटक, दत्त भजन मंडळ खेडी , सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य व प्रकाश पाटील ठाकरे व गावातील नागरीकानी सहकार्य केले.