कन्हान: सत्रापुर कन्हान येथील इशिता खडसे ही मुलगी सदर नागपुर येथुन दहादिवसा अगोदर हरविली होती. तेजस संस्थाचे अध्यक्ष व उपाध्यक्ष हयानी या मुलीचा शोध लावुन सदर पोलीस स्टेशन व महिला बाल सुधार कल्याण समितीची कागदोपत्री कार्यवाही पुर्ण करून हरविलेली मुलगी इशिता व आई माया खडसे या दोघी माय लेकीचा मिलाप करून दिला.
सत्रापुर कन्हान येथील अत्यंत गरीब व मांग-गारोडी समाजातील विधवा माला मनोहर खडसे यांना मंदबुध्दी असलेला १५ वर्षाचा एक मुलगा व १० वर्षाची इशिता मुलगी आहे. त्या प्लास्टिक झिली, बॉटल व इतर भंगार सामान वेचुन आपल्या परिवाराचा उदरनिर्वाह करतात. शनिवार दि.१३ एप्रिल २०१९ ला मुलीला सोबत घेऊन सदर नागपुर परिसरात प्लास्टिक व भंगार सामान वेतताना मुलगी इशिता हरविली. तिचा त्या परिसरात शोध घेतला परंतु ती मिळाली नाही. मुलीच्या शोधात व्याकुळ आई माया खडसे यांनी कामठी येथील तेजस बहुउद्देशिय संस्था चे अध्यक्ष चंद्रशेखर आगुटलेवार , उपाध्यक्ष देवविदास पेटारे यांची भेट घेऊन आपबीती सांगुन मदत मांगितली असता सदर पोलीस स्टेशन नागपुर ला जावुन विचारपुस केली तर तेथील अधिकारी यांनी सांगितले की, ट्विंकल फाउंडेशनच्या सदस्यानी दि १३ एप्रिल लाच या मुलीला पोलीस स्टेशनला आणुन दिले. त्यामुळे आम्ही तिला महिला बाल सुधार कल्याण समिति नागपुर येथे ठेवलेले आहे. तबल दहा दिवसांनी मंगळवार (दि२३) ला हरविलेली इशिता खडसे मिळाल्याने तेजस संस्थेचे अध्यक्ष चंद्रशेखर आगुट लेवार व उपाध्यक्ष देविदास पेटारे हयानी बाल महिला विकास सुधार कल्याण समिति व सदर पोलीस स्टेशन चे कागदोपत्री कार्यवाही पुर्ण करून हरविलेली मुलगी इशिता ला आई माया खडसे ला सुपुर्द करून या दोघीं माय लेकीचा मिलाप करून मौलिक कार्य केले.
ट्विंकल फाउंडेशनचे सदस्य, सदर पोलीस स्टेशन नागुपर चे अधिकारी व कर्मचारी तसेच महिला बाल सुधार कल्याण समिती नागपुर चे अधिकारी व कर्मचारी यांचे तेजस बहुउद्देशिय संस्था चे अध्यक्ष चंद्रशेखर आगुटलेवार व उपाध्यक्ष देविदास पेटारे हयानी सर्वाचे आभार व्यकत करून गोर गरिब, गरजु लोकांना सदैव मदतीस प्रर्यत्नशिल राहु असे मनोगत याप्रसंगी प्रकट केले.
