Published On : Mon, Jun 10th, 2019

तहसिलदारा अरविंद हिंगेने ठोठावला 29 लक्ष 86 हजार 200 रुपयाचा महसूल दंड

Advertisement

कामठी: कामठी तालुक्यांतर्गत येणाऱ्या बिना हे गाव एके काळी वाळूची खान म्हणून प्रसिद्ध पावलेले गाव आहे या गावातील बिनासंगम परिसरात अवैधरित्या माती उत्खनन प्रकरणात खापरखेडा पोलिसांनी गौण खनिज तस्कर बाजावर धाड घालून या कामात उत्खननसाठी वापरण्यात आलेले जेसीबी मशीन व दोन मातीचे ट्रक असा एकूण 60 लक्ष 16 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करून गौण खनिज तस्कर बाजावर गुन्हा सुद्धा नोंदविण्यात आल्याची कारवाही नुकतीच करण्यात आली असून या प्रकरणात कामठी चे तहसीलदार अरविंद हिंगे यांनी महाराष्ट्र महसूल अधिनियम 1966 मधील तरतुदीनुसार सात गौण खनिज तस्कर बाजावर 29 लक्ष 86 हजार 200 रूपयाचा महसूल दंड ठोठावल्याची कारवाही आज करण्यात आली असून महसूल दण्ड ठोठावल्या या गौण खनिज तस्कर बाजामध्ये गणेश अशोक बलकी, राजेंद्र उपासे, सुरेंद्र राऊत, चंद्रभान भडंग, जितेंद्र भरडे, वामन भडंग, पुरुषोत्तम धांडे यांच्या नावाचा समावेश आहे.या कारवाहिमुळे सर्व अवैध वाळू तस्कर तसेच गौण खनिज तस्करबाजा चे धाबे दणाणले असून एकच खळबळ माजली आहे. महसूल दण्ड ठोठावल्या या गौण तस्कर

तहसिलदार अरविंद हिंगे यांनी दिलेल्या माहिती नुसार बिनासंगम येथील शेत सर्व्हे क्रमांक 115 आराजी 2.88हॅकटर या शेतजमिनीमधून उपरोक्त नमूद सात तस्कर बाज 533 ब्रास गौंण खनिज मातीचे उत्खनन केल्यामुळे बाजार भाव किंमत प्रति ब्रास 1000 रुपये प्रमाणे पाच पट दंडाची रक्कम प्रति ब्रास पाच हजार रुपये व रॉयल्टी 400 रुपये असे एकूण 5 हजार 400 रुपये प्रमाणे 533 ब्रास अवैध गौण माती उत्खनन केल्याने 29 लक्ष 86 हजार 200 रुपयांचा दण्ड ठोठावण्यात आला.

– संदीप कांबळे कामठी