Published On : Thu, Jun 11th, 2026
By Nagpur Today Nagpur News

सुनेत्रा पवारांच्या खासगी विमानात तांत्रिक अडथळा; दिल्ली दौऱ्याला दोन तासांचा विलंब

Advertisement

मुंबई : उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या प्रवासासाठी वापरण्यात येणाऱ्या खासगी विमानात सोमवारी (९ जून) उड्डाणापूर्वी तांत्रिक समस्या आढळून आल्याची माहिती समोर आली आहे. मुंबईहून दिल्लीकडे रवाना होण्याच्या तयारीत असताना हा बिघाड निदर्शनास आल्याने विमानाचे उड्डाण काही काळासाठी पुढे ढकलावे लागले.

माहितीनुसार, विमान सायंकाळी ५ वाजता दिल्लीसाठी निघणार होते. मात्र, अंतिम तपासणीदरम्यान वैमानिकाच्या लक्षात तांत्रिक त्रुटी आल्याने विमान तत्काळ थांबवण्यात आले. त्यानंतर अभियंत्यांकडून आवश्यक तपासणी आणि दुरुस्ती करण्यात आली. सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर विमानाने सुमारे दोन तास उशिराने, रात्री ७ वाजता दिल्लीकडे उड्डाण केले.

Gold Rate
July 28 ,2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 1 42,900 /-
Gold 22 KT ₹ 1,32,600 /-
Silver/Kg ₹ 2,18,900/-
Platinum ₹ 88,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

या विमानात सुनेत्रा पवार यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते पार्थ पवार, खासदार सुनील तटकरे आणि खासदार प्रफुल्ल पटेल हे देखील प्रवास करत होते. दिल्लीतील महत्त्वाच्या बैठकीसाठी हे सर्व नेते रवाना होत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

दरम्यान, संबंधित विमान हे व्हीएसआर (VSR) कंपनीचे असल्याचे सांगितले जात आहे. तांत्रिक दोष दूर केल्यानंतर त्याच विमानाद्वारे पुढील प्रवास करण्यात आला. विमानातील बिघाडामुळे उड्डाणास विलंब झाला असला, तरी सर्व प्रवासी सुरक्षितपणे दिल्लीला पोहोचल्याची माहिती समोर आली आहे.

Advertisement

या घटनेनंतर पुन्हा एकदा व्हीएसआर कंपनीच्या विमानांच्या सुरक्षिततेबाबत चर्चा सुरू झाली आहे. यापूर्वीही या कंपनीच्या विमानांबाबत विविध स्तरांवर प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. त्यामुळे या तांत्रिक बिघाडाच्या पार्श्वभूमीवर विमानांच्या देखभाल व सुरक्षाविषयक प्रक्रियांकडे पुन्हा लक्ष वेधले जात आहे.

Advertisement
BJP के बाद शिवसेना सबसे बड़ा दल : उदय सामंत #UdaySamant #ShivSena #Politics #BJP #NDA #newsupdate

BJP के बाद शिवसेना सबसे बड़ा दल : उदय सामंत #UdaySamant #ShivSena...

भूमि अधिग्रहण के खिलाफ किसानों का पैदल मार्च #protest #Bhiwandi   #KisanAndolan #MaharashtraNews

भूमि अधिग्रहण के खिलाफ किसानों का पैदल मार्च #protest #Bhiwandi #KisanAndolan #MaharashtraNews

भिवंडी यातायात विभाग के ई-मेल आईडी बंद पड़े #maharashtranews #bhiwandi #maharashtra #newsupdates

भिवंडी यातायात विभाग के ई-मेल आईडी बंद पड़े #maharashtranews #bhiwandi #maharashtra #newsupdates

छह महीने बाद भी जांच अधूरी, युगेंद्र पयार नाराज #maharastranews #baramati #newsupdate #maharashtra

छह महीने बाद भी जांच अधूरी, युगेंद्र पयार नाराज #maharastranews #baramati #newsupdate...

नांदेड़ सहकारी बैंक चुनाव, मतगणना आज से शुरू #maharashtranews #nanded #maharashtra #newsupdate #news

नांदेड़ सहकारी बैंक चुनाव, मतगणना आज से शुरू #maharashtranews #nanded #maharashtra #newsupdate...

अमरावती में पांच जुआ अड्डों पर पुलिस की रेड

अमरावती में पांच जुआ अड्डों पर पुलिस की रेड

GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges