Published On : Thu, May 14th, 2026
By Nagpur Today Nagpur News

अकरावी प्रवेश प्रक्रियेत तांत्रिक गोंधळ; विद्यार्थ्यांसह पालकही हैराण

Advertisement

मुंबई : दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेला वेग आला असला, तरी तांत्रिक अडचणींमुळे राज्यभरातील शेकडो विद्यार्थी आणि पालकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. प्रवेशासाठी दिलेला एकमेव हेल्पलाइन क्रमांक सतत व्यस्त लागत असल्याने पालकांनी नाराजी व्यक्त केली आहे.

ऑनलाइन अर्ज भरताना लॉगिन समस्या, संकेतस्थळ संथ गतीने चालणे आणि तांत्रिक त्रुटींमुळे विद्यार्थ्यांचा खोळंबा होत असल्याचे समोर आले आहे. नेरूळमधील एका विद्यार्थ्याला लॉगिन करण्यासाठी तब्बल अर्धा तास प्रतीक्षा करावी लागल्याचे पालकांनी सांगितले.

Gold Rate
Sept 29,2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 1 47,300 /-
Gold 22 KT ₹ 1,36,5700 /-
Silver/Kg ₹ 2,22,300/-
Platinum ₹ 88,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

ठाणे, पालघर, अंधेरी, बोरिवली, मुलुंड, भांडुप आणि भायखळा परिसरातील अनेक विद्यार्थ्यांनाही बुधवारी दिवसभर तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागला. त्यामुळे प्रवेश प्रक्रियेबाबत पालकांमध्ये संभ्रम आणि चिंता वाढली आहे.

विद्यार्थ्यांच्या तक्रारींचे तत्काळ निवारण व्हावे यासाठी राज्यस्तरावर स्वतंत्र हेल्पलाइन क्रमांक सुरू करावेत, तसेच विभागनिहाय संपर्क केंद्रांची माहिती संकेतस्थळावर जाहीर करावी, अशी मागणी पालकांनी केली आहे. मुंबईसारख्या मोठ्या शहरात अतिरिक्त तक्रार निवारण केंद्र सुरू करण्याचीही मागणी पुढे आली आहे.

Advertisement

दरम्यान, दुपारनंतर काही प्रमाणात तांत्रिक समस्या दूर झाल्याचे काही पालकांनी सांगितले. विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी मुंबई विभागात विविध ठिकाणी तक्रार निवारण केंद्र सुरू करण्यात आली असून, तेथे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges

Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.