Published On : Thu, May 14th, 2026
By Nagpur Today Nagpur News

दिल्ली, पंजाबसह महाराष्ट्रातही SIR ची तारीख जाहीर; निवडणूक आयोगाने 16 राज्ये आणि 3 केंद्रशासित प्रदेशांचे वेळापत्रक केले प्रसिद्ध

Advertisement

नवी दिल्ली : निवडणूक आयोगाने स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन (SIR) प्रक्रियेच्या तिसऱ्या टप्प्याची घोषणा केली असून, देशातील 16 राज्ये आणि 3 केंद्रशासित प्रदेशांमध्ये मतदार यादीची विशेष पडताळणी मोहीम राबविण्यात येणार आहे. या टप्प्यात दिल्लीसह महाराष्ट्राचाही समावेश करण्यात आला आहे. दिल्लीची अंतिम मतदार यादी 7 ऑक्टोबर 2026 रोजी प्रसिद्ध होणार असल्याची माहिती आयोगाने दिली.

तिसरा टप्पा पूर्ण झाल्यानंतर हिमाचल प्रदेश, जम्मू-काश्मीर आणि लडाख वगळता संपूर्ण देशात SIR प्रक्रिया पूर्ण होणार आहे. हिमवृष्टी आणि प्रतिकूल हवामान लक्षात घेता या तीन भागांतील कार्यक्रम नंतर जाहीर करण्यात येणार असल्याचे निवडणूक आयोगाने स्पष्ट केले.

Gold Rate
July 20 ,2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 1 42,400 /-
Gold 22 KT ₹ 1,32,100 /-
Silver/Kg ₹ 2,20,400/-
Platinum ₹ 88,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

निवडणूक आयोगाच्या माहितीनुसार, तिसऱ्या टप्प्यात ओडिशा, मिझोरम, सिक्कीम, मणिपूर, दमण-दीव, उत्तराखंड, आंध्र प्रदेश, अरुणाचल प्रदेश, हरियाणा, चंदीगड, तेलंगणा, पंजाब, कर्नाटक, मेघालय, महाराष्ट्र, झारखंड, दिल्ली, नागालँड आणि त्रिपुरा या राज्ये व केंद्रशासित प्रदेशांचा समावेश आहे.

या विशेष मोहिमेदरम्यान तब्बल 3.94 लाखांहून अधिक बूथ लेव्हल अधिकारी (BLO) सुमारे 36.73 कोटी मतदारांच्या घरी जाऊन संपर्क साधणार आहेत. मतदार यादी अधिक अचूक, पारदर्शक आणि अद्ययावत करण्यासाठी ही मोहीम राबवली जात असल्याचे आयोगाने म्हटले आहे.

Advertisement
Advertisement
अमरावती डबल मर्डर केस में बड़ा खुलासा! #AmravatiNews #MaharashtraNews #DoubleMurder #CrimeNews

अमरावती डबल मर्डर केस में बड़ा खुलासा! #AmravatiNews #MaharashtraNews #DoubleMurder #CrimeNews

वर्धा में राष्ट्रवादी युवक कांग्रेस का धरना #MaharashtraNews #NCP  #SonamWangchuk #NEET #PaperLeak

वर्धा में राष्ट्रवादी युवक कांग्रेस का धरना #MaharashtraNews #NCP #SonamWangchuk #NEET #PaperLeak

अमरावती में छात्रों का जोरदार प्रदर्शन #vidarbhanews #amravati  #updatenews #maharashtranews

अमरावती में छात्रों का जोरदार प्रदर्शन #vidarbhanews #amravati #updatenews #maharashtranews

रील्स के चक्कर में मलंगगढ़ पर फंसे युवक #maharashtranews  #ambarnath  #updatenews #maharashtra

रील्स के चक्कर में मलंगगढ़ पर फंसे युवक #maharashtranews #ambarnath #updatenews #maharashtra

निरुपम का शिंदे नेतृत्व पर बड़ा दावा #NagpurNews #ShivSena #ubt  #political #LatestNews #NewsUpdate

निरुपम का शिंदे नेतृत्व पर बड़ा दावा #NagpurNews #ShivSena #ubt #political #LatestNews...

भारी बारिश में छात्रों का वांगचुक समर्थन प्रदर्शन #maharashtranews #bhiwandi #updatednews #news

भारी बारिश में छात्रों का वांगचुक समर्थन प्रदर्शन #maharashtranews #bhiwandi #updatednews #news

GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges