उशिरा पगारबील सादर करणा-या पं.स.वर कारवाई करा
कन्हान: शिक्षकांना दरमहा एक तारखे ला वेतन अदा करण्याबाबत शासणाने वेळोवेळी परिपत्रके काढलीत तरीसुद्धा पगारास उशीर होणे ही बाब आता नित्याचीच झाली आहे.
सध्यास्थितीत शालार्थ वेतन प्रणाली बंद असल्यामुळे ऑफलाईन वेतन काढले जात आहे. शिक्षकांना वेळेवर वेतन देता यावे म्हणून सर्व पंचायत समि तीचे गटशिक्षणाधिकारी यांनी महिन्याचे १२ तारखे पर्यंत पगार बील जिल्हा परिषदेला सादर करण्याचे लेखी निर्देश या पुर्वीच दिलेले आहे. परंतु काही पंचायत समित्यांचे पगार बील निर्धारित वेळेत जिल्हा परिषदेला दिरंगाई होत असल्या मुळे जिल्ह्यातील संपुर्ण शिक्षकांचे वेतनाला विलंब होतो. तर काही पंचायत समितीमध्ये जिल्हा परिषदे कडून आरटीजीएस द्वारे वेतन अनुदान प्राप्त झाल्यानंतरही तातडीने वेतन शिक्षकांचे बँक अकाउंटला जमा केल्या जात नाही. त्यामुळे निर्धारित वेळेत पगारबील सादर न करणा-या व अनुदान प्राप्त झाल्यानंतरही तातडीने वेतन शिक्षकांचे बँक अकाउंटला जमा न करणा-या पंचायत समितीवर कारवाई करण्याची मागणी अखिल नागपूर जिल्हा प्राथमिक शिक्षक संघाच्या वतीने, जिल्हा नेते गोपालराव चरडे, रामु गोतमारे, सुनिल पेटकर, सुभाष गायधने , अध्यक्ष धनराज बोडे, सरचिटणीस विरेंद्र वाघमारे, सुरेश समर्थ, आनंद गिरडकर, निलेश राठोड, पंजाब राठोड, लोकेश सुर्यवंशी, दिलीप जिभकाटे, कृष्णा टिकले, अशोक बावनकुळे, उज्वल रोकडे, प्रेमचंद राठोड, आशा झिल्पे, सिंधू टिपरे, वंदना डेकाटे, सुनंदा देशमुख आदींनी केली.
” पंचायत समितीच्या शिक्षण विभागा कडून निर्धारित वेळेत वेतनदेयक जिल्हा परिषदेला सादर होत नसल्यामुळे तसेच वेतन अनुदान आल्यानंतरही काही पंचायत समिती कडून तातडीने कार्यवा ही होत नसल्यामुळे शिक्षकांचे वेतनास विलंब होतो. त्यामुळे संबंधितांवर जबाबदारी निश्चित करून कारवाई करण्यात यावी..”– श्री धनराज बोडे, जिल्हाध्यक्ष, अखिल नागपूर जिल्हा प्राथमिक शिक्षक संघ.