Published On : Sat, Sep 7th, 2019

शिक्षक प्रशांत जांभुळकर आदर्श शिक्षक राज्यपुरस्काराने सन्मानित

Advertisement

रामटेक:-महाराष्र्ट राज्य शालेय शिक्षण क्रीडा व युवक कल्याण विभागाद्वारे देण्यांत येणार्‍या २०१८-१९सत्रातील आदर्श शिक्षक राज्यपुरस्काराने स्थानिक कलावंत शिक्षक प्रशांत जांभुळकर यांना रंगशारदा सभागृह बांद्रा मुंबई येथे आयोजित समारंभात शिक्षक दिनी सपत्निक सन्मानित करण्यांत आले.

शालेय शिक्षण मंत्री आशिष शेलार,उच्च तंत्र शिक्षण मंत्री विनोद तावडे यांच्या हस्ते तसेच आमदार सरदार तारासिंग,शिक्षक आमदार कपिल पाटील,शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी,शिक्षण सचिव सौरभ विजय,शिक्षण उपसंचालक दिनकर पाटील,शिक्षण संचालक दत्तात्रय जगताप यांच्या उपस्थितीत शिक्षक प्रशांत पांडुरंग जांभुळकर पत्नी ज्योती जांभुळकर यांना आदर्श शिक्षक राज्य पुरस्कार सन्मानपुर्वक प्रदान करण्यांत आला.

Gold Rate
09 May 2025
Gold 24 KT 96,800/-
Gold 22 KT 90,000/-
Silver/Kg 96,500/-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

जि.प.शाळा कांद्री केंद्र मनसर येथे कार्यरत प्रशांत उपक्रमशील व कलावंत शिक्षक म्हणून परिचित असून ते उत्तम तबलावादक व बालकविताकारही आहेत.शैक्षणिक साहित्य निर्मिती ,सहशालेय उपक्रमांसह विविध सामाजिक कार्यात त्यांचा सहभाग असतो. त्यांचा राज्यपुरस्काराने गौरव झाल्याबद्धल सर्वत्र अभिनंदन करण्यांत येत आहे.

Advertisement
Advertisement