Published On : Thu, Jan 30th, 2020

शिक्षक नामदेवराव कडूकर यांचा सत्कार

Advertisement

रामटेक : 71 वा प्रजासत्ताक दिन कार्यक्रम ग्राम पंचायत नगरधन येथिल पटांगनावर ध्वजारोहण करण्यात आले. तसेच जि. प. शाळा नगरधन येथे ध्वजारोहण करून प्रजास्ताक दिनानिमित्त कार्यक्रमाचे अध्यक्ष गावाचे प्रथम नागरिक प्रशांत कामडी सरपंच ग्रामपंचायत नगरधन यांचा अध्यक्षते खाली संपन्न झाले.शिक्षणक्षेत्रात उल्लेखनिय कार्य करण्याऱ्या गुणीजन मान्यवर शिक्षक नामदेवराव जी कडूकर ,रमेश बिरणवार ,दीपक मोहाड ,सौ.अनुराधा रेवतकर,नामदेवराव कामडी यांचा शाल श्रीफळ सन्मान चिन्ह देऊन गौरव करण्यात आला.

तसेच ग्रामपंचायत नगरधन चा वतीने नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्य दुधीराम सव्वालाखे ,पंचायत समिती सदस्य भूषण होलगीरे यांचे सत्कार करण्यात आले.तसेच गावामधून १० वि मधून प्रथम साक्षी महादेव कामडी ,दिव्तीय दिव्या शेंडे ,तिसरा कु.पूजा मलेवार तसेच ईयत्ता १२ वि मधून प्रथम,दिव्तीय,तिसरा क्रमांक घेणाऱ्या विध्याथ्री यांचा शाल श्रीफळ ओ सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला .कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुख्यध्यापिका मुन मैडम व ग्रामपंचायत कर्मचारी अतुल दमाहे यांनी केले .तसेच आभार प्रदर्शन ग्रामपंचायत नगरधन चे ग्रामविकास अधिकारी पी.एच.ऊईके यांनी केले.

सांस्कृतिक कार्यक्रम झाल्या नंतर लगेच ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले व ग्रामसभेत शासकीय योजनेचे माहिती देण्यात आली.व गावाकाराण्याचे समस्याचे निराकरण करण्यात आले,कार्यक्रमाला ग्रामपंचायत नगरधन चे उपसरपंच चंद्रकांत उर्फ पिंटू नंदनवार ,ग्रामपंचायत सदस्य निर्मला हिवारे ,शिवराम रामेलवार ,निलेश मेश्राम ,अनिल मुटकुरे,प्रकाश लांबट ,सागर धुर्वे ,गोपाल राऊत ,अनिता वाघमारे ,शिला गडपायले ,वंदना बिरणवार ,रूपा अजबैले ,निर्मला कामडी ,अरुणा पाचे ,ज्योती शेंडे ,इंदिरा सरोदे ,मंगला लिल्हारे तसेच ग्रामपंचायत कर्मचारी आणि समस्त गावकरी उपस्थित होते .