Published On : Fri, Jun 15th, 2018

जात वैधता प्रमाणपत्र जमा करण्याकरिता वेळ द्यावा

कन्हान :अनुसुुचित जाती /जमाती (एससी व एसटी) च्या विद्यार्थ्यांना इयत्ता १२ वी च्या नंतर पुढील उच्च शिक्षणा करिता प्रवेश प्रक्रिया दरम्यान जात वैधता प्रमाणपत्र ( वेलेडिटी सर्टिफिकेट) देणे संभव नाही आहे . या प्रमाणपत्र शिवाय विद्यालय प्रवेश देत नसल्याने विद्यार्थ्यांना मनपंसद उच्च शिक्षणाला, कोर्सला मुकावे लागत आहे . एससी ,एसटी प्रवर्गातील ( केटेगरी) विद्यार्थ्यांना प्रवेश घेण्याकरिता जात वैधता प्रमाणपत्र आवश्यक असते .

यास्तव विदर्भ खाटिक फेडरेशन द्वारे मा. आत्राम साहेब, उप विभागीय आयुक्त, समाज कल्याण विभाग नागपूर यांना निवेदन देऊन विद्यार्थ्यांना विद्यालयात जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्याकरिता तीन ते चार महिन्याचा कालावधी देण्यात यावा अशी मागणी करण्यात आली.कारण की, विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र तयार करण्यात करिता तीन ते चार महिने लागत असतात. जेव्हा की , महाराष्ट्र शासनाचा कुठलाच असा जी आर नाही की , प्रवेश घेतानीच जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यात यावे . यास्तव विद्यार्थ्यांना हा कालावधी देण्यात यावा .

तसेच फेडरेशन व्दारे समाज कल्याण विभागास आग्रहाची विनंती केली की, ग्रामीण भागातील १० वी व १२ वी नंतर विद्यार्थ्यांना कुठले आणि कसले उच्च शिक्षण, अभ्यासक्रम घ्यावा , त्याचा उपयोग याबाबत गांव व तहसिल स्तरावर शिबीर आयोजित करून प्रशिक्षण देण्याची सोय करण्यात यावी .

विदर्भ खाटिक फेडरेशनचे माजी सहाय्यक जिल्हाधिकारी मा. मनोहर हिकरे यांच्या नेतृत्वात उप विभागीय आयुक्त श्री आत्राम साहेब यांना शिष्टमंडळ भेटुन निवेदन देऊन विद्यार्थ्यांच्या उज्वल भविष्या करिता मागणी करण्यात आली . शिष्टमंडळात गणेश माहुरे , अँड. जयमाला लवते , विशाल लारोकर , विनोद माहोरे , डॉ सोनकर , प्रवीण माकोडे , राजेश मदने , अरूण बेहर आदीच्या प्रमुख उपस्थितीत निवेदन सादर करून न्यायीक मागणी करण्यात आली .