Published On : Fri, Jun 15th, 2018

हलबा समाजाच्या मागणीसाठी युवक काँग्रेसचा जिल्हाधिकारी कार्यालयाचा घेराव

Advertisement

नागपूर लोकसभा युवक काँग्रेस ने हलबा समाजाच्या जात प्रमाणपत्राबाबत अखिल भारतीय युवक काँग्रेस चे राष्ट्रीय सचिव व नगरसेवक बंटी बाबा शेळके यांच्या मार्गदर्शनात तसेच नागपूर लोकसभा युवक काँग्रेस हलबा आघाडी अध्यक्ष मोतीराम मोहाडीकर यांच्या नेतृत्वात 500 हलबा बांधवा समवेत जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली.

जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी वेळ दिल्यावर ही पळ काढला तेव्हा युवक काँग्रेस व हलबा बांधव संतापले व उपजिल्हाधिकारी खजांजी यांना घेराव घातला नगरसेवक बंटी शेळके व मोतीराम मोहाडीकर संतापले प्रचंड प्रमाणात उपजिल्हाधिकारी यांच्याशी शाब्दिक वाद झाला 2014 च्या लोकसभा निवडणुकीत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व विधानसभा निवडणुकीच्या वेळेस हलबा समाजाला अनेक आश्वासन दिली त्यात जात प्रमाणपत्राचा प्रश्न ताबडतोब सोडवू उलट भाजपाच्या दबावाखाली जिल्हाधिकारी काम करत आहे. जात पडताळणी प्रमाण पत्रापासून विध्यार्थी वंचित आहे.

Gold Rate
13 May 2025
Gold 24 KT 94,300/-
Gold 22 KT 87,700/-
Silver/Kg 97,300/-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

हलबा समाजाचे विध्यार्थी एवढे आक्रमक झाले की सात दिवसाच्या आत जातप्रमाण पत्राचा प्रश्न सोडविला नाही तर आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहन करू जेव्हा की 1886 च्या ब्रिटिश कालीन पुस्तकात कोष्टी हा विवर(विणकर)शब्द नमूद केला असे मोतीराम मोहाडीकर यांनी म्हंटले.मोतीराम मोहाडीकर व अन्य पाच जणांना जातप्रमाण पत्र मिळाले आहे. तसे त्यांना दाखविण्यात आले तरी ही प्रशासन भाजपा च्या दबावात हलबा समाजातील बांधवांना जातप्रमाण पत्राबाबत करू पाहू ची भाषा वापरत आहे. उपजिल्हाधिकारी सत्ताधाऱ्याच्या दबावाखाली काम करत असल्याचा आरोप मोतीराम मोहाडीकर यांनी केला.हलबा समाजाची भारतीय जनता पार्टीने फसवणूक केली असे बंटी शेळके यांनी म्हंटले.

नागपुरातील मुख्यमंत्री असून आज 4 वर्षांचा कालावधी झाला तरी ही जातप्रमाण पत्राचा प्रश्न सोडवून राहिले नाही.या अन्यायापोटी हलबा समाजातील विध्यार्थी चे नुकसान होत आहे.सरकारला जाग आली नाही तर युवक काँग्रेस रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करेल व शहरात मंत्र्यांच्या गाड्या फिरू देणार नाही अशी कडक चेतावणी बंटी शेळके यांनी दिली.याप्रसंगी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे महासचिव बबनराव तायवाडे,माजी नगरसेवक गणपती शाहीर,माजी नगरसेवक रमण पैगवार,माजी नगरसेविका ललिता निमजे,रवी गौर,नगरसेवक रमेश पुणेकर,रमेश निमजे,किशोर शिरपूरकर,ओमप्रकाश शाहीर, गंगाधर मोहाडीकर,उमराव खरबीकर,शंकर रणदिवे,सुरेंद्र राय,नरेश चौधरी,अक्षय डोरलीकर,मंगेश पाठराबे, प्रभाकर खापरे,मनोज कनोजिया,गिरीश बावणे,मोरेश्वर बोबडे,ताराचंद बारापात्रे, नारायण पराते,मेघराज बारापत्रे,अमरसिंग धवसेल,अशोक उमरेडकर,गिरीधर हेडाऊ,प्रदीप सोनकुसरे,सचिन इंगोले,राकेश सिरसिकर,राकेश निकोशे,प्रवीण कांबळे,राधा अडयालकर,अनिता अडयालकर,वच्ची अडयालकर, पुष्पां लांभाते,योगेश निमजे,धनराज खापेकर,सचिन पाठराबे,शंतनू नंदनवार,प्रकाश लायसे,नरेश गुंमगावकर,कृष्णा पौणिकर, मधुकर काठिकर,संजय निखारे,घोरडकर काका,महेश गवठे,स्वप्नील ढोके,हेमंत कातुरे इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते.

Advertisement
Advertisement