Published On : Mon, Jun 24th, 2019

नागपूरच्या तापमानाचा लाभ घेत मेट्रोने केली १ लाख युनिट वीज निर्मिती

नागपूर मेट्रो ने केली २३४२ सोलर पॅनलची स्थापना

नागपूर : नागपूरच्या तापमानाचा सर्वांनाच फटका बसला असला तरी महा मेट्रो नागपूरने मात्र या काळात सौर उर्जेची निर्मिती करत मोठ्या प्रमाणात वीज बचत केली आहे.महा मेट्रोने बसविलेल्या सौर पॅनल मुळेच हे शक्य झाले आहे.

Advertisement

महा मेट्रो ने खापरी,न्यू एयरपोर्ट,एयरपोर्ट साउथ आणि एयरपोर्ट स्टेशन येथे अनुक्रमे २०९,३४६,४०७ आणि ५४० सौर पॅनल बसविले आहे. हे ४ स्टेशन मिळून एकूण १५०२ सोलर पॅनल मेट्रो ने बसविले आहेत. यासोबतच मेट्रो भवन येथे देखील ८४० सोलर पॅनल बसविण्यात आले आहे.

Advertisement

याप्रमाणे मेट्रो ने आतापर्यंत एकूण २३४२ सोलर पॅनलची स्थापना ४ स्टेशन आणि मेट्रो भवन येथे केली आहे. फक्त में महिन्यात ४ स्टेशन आणि मेट्रो भवन मिळून १०४३०७ युनिट एवढ्या विजेची निर्मिती महा मेट्रोने केली. उर्वरित मेट्रो स्टेशनचे काम पूर्ण झाल्यावर तेथे देखील सोलर पॅनल बसविले जाणार आहे.

Advertisement

Advertisement
Advertisement
 

Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement