आज भारतीय जनता युवा मोर्चातर्फे नागपूर सुधार प्रन्यासच्या सभापती श्रीमती शीतल तेली – उगले , आय.ए.एस यांना फुटाळा तलावाची पाण्याची पातळी कमी झाल्यामुळे बराचसा गाळ हा त्या ठिकाणी जमा झालेला आहे व मागील वर्षी विसर्जित झालेल्या गणेश मूर्तीचे सांगाडे वर आलेले आहेत आणि उरलेली माती ही तेथे जमा झालेली आहे.
पाऊस येण्या आधी हा तलाव साफ करण्यात यावा असे निवेदन यावेळी भाजयुमो नागपूर महानगरातर्फे देण्यात आले. नासुप्र सभापतींनी त्वरित विषयाची शहानिशा करून येत्या आठवड्या भरात कारवाई करण्याची ग्वाही ही सभापतीच्या मार्फत देण्यात आली व तसे आदेश अधिकाऱ्यांना देण्यात आले.
यावेळी भारतीय जनता पार्टीचे माजी शहर अध्यक्ष आ. सुधाकरजी कोहळे,भाजयुमो शहर अध्यक्षा शिवानी दाणी वखरे उपस्थित होते.
या निवेदनाचे नेतृत्व भारतीय जनता युवा मोर्चा पश्चिम नागपूरतर्फे करण्यात आले. यावेळी भाजयुमो पश्चिम नागपूर अध्यक्ष कमलेश पांडे, महामंत्री बबलू बकसारिया, योगेश पचपोर, पुष्कर पोरशेट्टीवर, अमर खोडे, राजा मोहिते,सचिन पाली,मनजीत ठाकूर, संदीप कचडे,उदय मिश्रा,स्वप्नील खडगी,रोहित त्रिवेदी, सागर घटोळे, प्रतिष पाटील,प्रतीक बंधीर्गे व कार्यकर्ते उपस्थित होते.