Published On : Wed, Jul 31st, 2019

गुलाबी बोंडअळीच्या नियंत्रणासाठी कठोर उपाययोजना करा – अश्विन मुदगल

भरारी पथके तपासणार फेरोमन ट्रॅप

नागपूर‍: जिल्ह्यात चांगला पाऊस पडत असून, शेतीपिकांवर किडींचा प्रादुर्भाव होणार नाही. मात्र भविष्यात कापूस‍ पिकावरील गुलाबी बोंडअळी आणि मक्यावरील अमेरीकन लष्करी अळीवरील नियंत्रणासाठी कठोर उपाययोजना करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी अधिकाऱ्यांना दिले.

Gold Rate
19 Sept 2025
Gold 24 KT ₹ 1,10,300 /-
Gold 22 KT ₹ 1,02,600 /-
Silver/Kg ₹ 1,29,600/-
Platinum ₹ 48,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

छत्रपती सभागृहात आयोजित कापूस पिकावरील गुलाबी बोंडअळी व्यवस्थापनाच्या दृष्टीने नियोजन व अंमलबजावणीबाबत कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक घेण्यात आली. त्यावेळी जिल्हाधिकारी बोलत होते.

यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी मिलींद शेंडे, सीआयसीआरचे शास्त्रज्ञ डॉ. एस. एम. वासनिक, डॉ. विश्लेष नगरारे, प्रा. डॉ. राहुल वडस्कर, डॉ. अनिल मोरे, प्रा. राम गावंडे, प्र. दि. देशमुख आणि तंत्र अधिकारी अर्चना कोचरे यांची उपस्थिती होती.

जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी जिल्ह्यात झालेल्या विविध पीक पेरणीचा आढावा घेतला. प्रामुख्याने कापूस, धान, तूर, मका, संत्रा, ऊस आदी पिकांखालील क्षेत्र, पुढील काही दिवसांमध्ये पावसाने अल्पविश्रांती घेतल्यास धान रोवणीचा वेग वाढेल. त्यामुळे जिल्ह्यातील धान पिकांखालील क्षेत्रात वाढ होईल. त्याची आठवडाभरात पिकांखालील क्षेत्रात होणाऱ्या वाढीची माहिती संकलीत करावी. तसेच भविष्यात पावसाने दडी मारली अथवा अतिवृष्टी झाल्यास पिकविमा, पिकांवर पडणारे रोग, कापूस आणि मका पिकांवर गुलाबी बोंड अळी आणि अमेरीकन लष्करी अळीचा प्रादुर्भाव होणारच नाही, याबाबत शेतकऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर जनजागृती करण्याचे निर्देशही जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी दिले.

गुलाबी बोंड अळी आणि अमेरीकन लष्करी अळीवर नियंत्रण मिळविण्यासाठी जिल्ह्यात गावसभा आणि शेतीशाळा घ्यावात. तसेच कृषी पर्यवेक्षक, कृषी सहाय्यकांनी शेतीशाळांच्या माध्यमातून पतंग पकडण्यासाठी फेरोमन सापळे, ल्यूर्स,ट्रायकोकार्डबाबत मार्गदर्शन करत शेतकऱ्यांना प्रशिक्षित करावे. कापूस पिकावरील गुलाबी बोंडअळीसाठी निंबोळी पावडर आणि पावडरपासून अर्क बनविण्यासाठी जिल्ह्यातील महिला बचत गटांना ‘ना नफा ना तोटा’ तत्त्वावर निंबोळी विक्री केंद्राचे काम द्यावे. निंबोळी पावडर व अर्कचा शेती व शेतकऱ्यांवर कोणतेही दुष्परिणाम होत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना निंबोळी अर्क वापरण्यासाठी प्रोत्साहन द्यावे. शेतकऱ्यांचा प्रतिसाद वाढल्यास अशाप्रकारचे निंबोळी अर्क विक्री केंद्र वाढवता येतील, अशा सूचना जिल्हाधिकारी यांनी दिल्या.

गुजरात राज्याच्या धर्तीवर जिनिंग प्रेसिंग आणि कापूस बियाणे उत्पादक कंपन्यांच्या प्रतिनिधींनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करावे. औषधे, खते आणि बी-बियाणे तपासणीसाठीच्या भरारी पथके नेमली जातात, तशी भरारी पथके नेमावीत. या पथकांनी उद्यापासून जिनींग –प्रेंसींग कारखान्यांमध्ये बोंडअळी नियंत्रणासाठी फेरोमन ट्रॅप लावले आहेत की नाहीत. तेथील कीडयुक्त कापूस बियाणे नष्ट केल्याची तपासणी करुन त्याचा अहवाल देण्याचे निर्देशही जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी दिलेत.

गेल्या वर्षी नागपूर, वर्धा आणि यवतमाळ जिल्ह्यात अंकुर बियाणे कंपनीने चांगले काम केले होते. यंदाही ही कंपनी तालुका व जिल्हा स्तरावर एका समन्वयकाची नेमणूक करण्यात आली असल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी मिलींद शेंडे यांनी दिली.

यावेळी जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी आतापर्यंत जिल्ह्यात झालेली पीक पेरणी आणि पुढील आठवड्याभरात पिकाखालील क्षेत्रात वाढ होईल, याबाबतचा आढावा घेतला.

Advertisement
Advertisement