Published On : Wed, Jul 31st, 2019

नागपूर विभागात सरासरी 55.58 मिमी पाऊस

भंडारा जिल्ह्यातील पवनी तालुक्यात सर्वाधिक 175 मिमी अतिवृष्टी

नागपूर जिल्ह्यातील भिवापूर तालुक्यात 139.10 तर उमरेड तालुक्यात 135.30 मिमी पावसाची नोंद

नागपूर : नागपूर विभागात गेल्या चोवीस तासात सरासरी 55.58 मिलीमीटर पावसाची नोंद झाली असूनभंडारा जिल्ह्यातील पवनी तालुक्यात सर्वाधिक 175 मि.मी. तर लाखांदूर तालुक्यात 77 मि. मी. पावसाची नोंद झाली. तसेच नागपूर जिल्ह्यातील भिवापूर तालुक्यात 139.10 तर उमरेड तालुक्यात 135.30 मि. मी. पावसाची नोंद झाली. नागपूर जिल्ह्यात नागपूर (शहर), नागपूर ग्रामीण, हिंगणा, मौदा व कुही तालुक्यात सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडला आहे.

वर्धा जिल्ह्यात देवळी 124.18, आर्वी तालुक्यात 124. 06 मि. मी., वर्धा 117.84 मिमी., समुद्रपूर 117.47 मि. मी. पाऊस पडला असून सेलू आणि हिंगणघाट तालुक्यातही सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडलाआहे. चंद्रपूर जिल्ह्यात चिमूर तालुक्यात 83.80 मि. मी. तर भद्रावती तालुक्यात 78.10 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. गडचिरोली जिल्ह्यातील कुरखेडा तालुक्यात 75.40, आरमोरी 71.90 तर वडसा तालुक्यात 69.50 मि. मी. अतिवृष्टीची नोंद झाली.

विभागात आज सकाळपर्यंत नोंदला गेलेला जिल्हानिहाय सरासरी पाऊस पुढीलप्रमाणे असून कंसातील आकडेवारी 1 जूनपासून आजवर झालेल्या पावसाची आहे.

वर्धा 94.06 (431.04), नागपूर 64.28 (468.09),भंडारा 64.21 (446.09), चंद्रपूर 43.13 (505.12) गडचिरोली 37.38 (607.14) तर सर्वात कमी पाऊसगोंदिया जिल्ह्यात 30.43 (407.03) पडला आहे. सर्व आकडेवारी मिलीमीटर परिमाणात आहेत.

नागपूर विभागात दिनांक 1 जून 2019 ते 31 जुलै2019 पर्यत सरासरी 477.42 मिलीमीटर पाऊस पडला आहे.