Published On : Wed, Jan 29th, 2020

अनुपालन पूर्तता समितीच्या कामकाजातील गांभीर्य जपून त्याची रितसर अंमलबजावणी करा: समिती सभापती ॲड. धर्मपाल मेश्राम यांचे निर्देश

Advertisement

नागपूर : मनपाच्या सभागृहामध्ये सदस्यांनी उपस्थित केलेले प्रश्न आणि नोटीस च्या माध्यमातुन विचारलेल्या माहितीच्या अनुषंगाने महापौरांनी संबंधित विषयाच्या दिलेल्या निर्देशाचे प्रशासनामार्फत अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीकोनातून अनुपालन पूर्तता समिती गठीत करण्यात आली.

ह्यापूर्वी ह्या समितीचे सभापती म्हणून तत्कालिन सत्तापक्ष नेते संदीपजी जोशी होते. महापौर होताच त्यांनी सभापती म्हणून ॲड. धर्मपाल मेश्राम ह्यांची नेमणूक केलेली आहे.

प्रशासकीय द्रुष्ट्या ही समिती अत्यंत महत्वाची असुन, समितीकडे येणारे विविध विषय आणि प्रश्नांवर लवकरात लवकर आवश्यक ती कार्यवाही व्हावी, यासाठी सर्वांनी समितीच्या कामकाजाचे गांभीर्य जपून त्याची तत्काळ प्रभावाने अंमलबजावणी करावी, असे निर्देश अनुपालन पूर्तता समितीचे सभापती ॲड.धर्मपाल मेश्राम यांनी दिले.

विविध विषयांचा आढावा घेण्यासंदर्भात बुधवार (ता.२९) मनपा मुख्यालयातील डॉ.पंजाबराव देशमुख स्मृती स्थायी समिती सभागृहात अनुपालन समितीची पहिली बैठकीत घेण्यात आली. बैठकीत समिती सभापती ॲड.धर्मपाल मेश्राम, सदस्या हर्षला साबळे, दिव्या धुरडे, सदस्य संजय बुर्रेवार, महेंद्र धनविजय, उपायुक्त राजेश मोहिते, उपायुक्त निर्भय जैन, उपायुक्त डॉ.रंजना लाडे, सहायक संचालक (नगररचना) प्रमोद गावंडे, सहायक आयुक्त (सा.प्र.वि.) महेश धामेचा, आरोग्य अधिकारी डॉ. प्रदीप दासरवार, निगम अधीक्षक मदन सुभेदार, सहायक विधी अधिकारी प्रकाश बरडे, सुरज पारोचे, विधी सहायक राहूल झांबरे आदी उपस्थित होते.

प्रारंभी अनुपालन समिती सभापतींनी समितीची पार्श्वभूमी विषद केली. मनपा सभागृहामध्ये सदस्यांनी विचारलेले प्रश्न, मांडलेले विषय यावर चर्चा झाल्यानंतर त्यावर महापौरांकडून आदेश दिले जातात. या आदेशांची वेळोवेळी अंमलबजावणी होते अथवा नाही, यावर समितीमार्फत निगरानी ठेवली जाते.

प्रशासनिक कार्यवाहीचे विवरण समितीपुढे सादर करा
समितीच्या कार्यात सुसूत्रता आणण्यासाठी सभागृहामधील प्रश्नांवरील कार्यवाहीबाबत विस्तृत विवरणाची सूची तयार करण्यात यावी. या सूचीमध्ये सदस्याचे नाव, त्यांच्यामार्फत विचारण्यात आलेले प्रश्न, त्या प्रश्नावर महापौरांकडून देण्यात आलेले आदेश, महापौरांच्या आदेशावर संबंधित विभागाकडून करण्यात आलेली कार्यवाही या सर्वांचे आजवरील विवरण समितीपुढे सादर करा, असे निर्देशही यावेळी अनुपालन पूर्तता समिती सभापती ॲड.धर्मपाल मेश्राम यांनी दिले.

अनुपालन पूर्तता समितीच्या प्रशासनिक कार्यामध्ये सुसूत्रता यावी यासाठी उपायुक्त राजेश मोहिते यांची समिती सचिव म्हणून नेमणूक करण्यात आली. समितीच्या कार्यासाठी दोन पुर्णवेळ लिपीक , स्टेनो व आवश्यक मनुष्यबळाची पूर्तता करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.

मनपात सद्यस्थितीत स्टेनोंची संख्या अपूर्ण असल्याने त्यांना मानधनावर नेमण्यासंबंधीची कार्यवाही सुरू करण्याचे निर्देशही त्यांनी