Published On : Wed, Jan 29th, 2020

धर्मराज विद्यालयात वार्षिक क्रीडा व स्नेहसंमेलन संपन्न

कन्हान : – धर्मराज प्राथमिक शाळा, माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ विज्ञान महाविद्यालय कान्द्री-कन्हान येथे क्रीडा व सांस्क्रुतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

सुप्त कलागुणाना प्रदर्शित करण्या साठी क्रीडा व सांस्क्रुतिक स्नेहसंमेलन विद्यार्थ्यांच्या हक्काचे व्यासपीठ आहे, स्पर्धेच्या युगात विद्यार्थ्यांनी विविध स्पर्धे त सहभाग घेऊन आपला व शाळेचा नावलौकिक करावा असे आवाहन उद्घा टन प्रसंगी नवनियुक्त जि.प.अध्यक्षा सौ रश्मी बर्वे यांनी केले.

प्रारंभी कार्यक्रमाचे अध्यक्ष इंदिरा एजूकेशन संस्थेचे संस्थाप क अध्यक्ष खुशालराव पाहुणे, माजी अग्नीशमन सभापती ॲड. संजय बाल पांडे, नवनियुक्त न.प.अध्यक्षा करुणा ताई आष्टनकर, जि.प.सदस्य व्यंकटेश करेमोरे, पंचायत समिती सदस्य नरेश मेश्राम, जिवलग पाटील, सहादेव मेन्घरे, लीलाधर डहारे, अरुणा हजारे यांच्या हस्ते दीप प्रज्वलित व सरस्वतीच्या प्रतिमेला माल्यार्पण करून कार्यक्रमाचे उदघाटन करण्यात आले. शाळेच्या मुख्याध्यापिका पमीता वासनिक यांनी प्रास्ताविकपर भाषण केले. कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी हरीश केवटे व दिनेश ढगे यांच्या मार्गदर्शनात विविध सांघिक व वैयक्तिक खेळ, एकल न्रुत्य, सामूहिक न्रुत्य, नाटिका आदींचे उत्कृष्ट सादरीक रण करीत प्रेक्षकांची मने जिंकली.

संचा लन अनिल सारवे व नरेन्द्र कडवे यांनी केले तर आभार शाळेच्या उपमुख्यध्यपी का अनिता हाडके यांनी मानले. कार्यक्र मांच्या आयोजनार्थ पर्यवेक्षक रमेश साखरकर, आशा हटवार, सुनिल लाडे कर, अनिल मंगर, शिवचरन फंदे, सतीश राऊत, प्रकाश डुकरे, सुरेंद्र मेश्राम, विलास डाखोळे, अनिरुद्ध जोशी, उदय भस्मे, धर्मेंद्र रामटेके, मुकेश साठवने, रजुसिंग राठोड, आत्माराम बावनकुळे, सचिन गेडाम, विजय पारधी, खिमेश बढिये, अमित मेन्घरे, प्रशांत घरात, पूजा धांडे, योगीता गेडाम, विद्या बालमवार, मनीषा डुकरे, दिपक बनकर, हरिश्चंद्र इंगोले, तेजराम गवळी, संतोष गोंनाडे, माला जीभकाटे, छाया कुरटकर, अपर्णा बावनकुळे, कोकिळा सेलोकर, करिश्मा नडे, शारदा समरीत, प्रिती सूरजबंशी, किशोर जिभकाटे, भीमराव शिंदेमेश्राम आदींनी सहकार्य केले.