Published On : Mon, Apr 13th, 2020

वाईट काळात गरिबांचा घास गिळणाऱ्या स्वस्त धान्य दुकांनदारावर कारवाही करा-सुरेश भोयर

कामठी :-कोरोना व्हायरस चा विषाणू संसर्गाच्या महामारीत सध्या सुरू असलेल्या संचारबंदी व लॉकडॉऊन मुळे गोरगरीब लोकांवर उदभवणारी उपासमारीची वेळ लक्षात घेता महाविकास आघाडी सरकारने योग्य ते ठोस पाऊले उचलत अन्न सुरक्षा योजने अंतर्गत वितरित होणाऱ्या धाण्यासह लाभार्थ्यांना प्रधानमंत्री गरीब कल्याण योजने अंतर्गत शिधपत्रिकेवरील प्रति सदस्य 5 किलो मोफत तांदूळ वितरित करण्याची सोय करून दिली मात्र कामठी तालुक्यातील काही रास्त भाव दुकानदार धान्य वाटपामध्ये तफावत करीत दुकानदार धान्य प्रत्यक्ष कमी वितरित करीत असल्याची तक्रारीला उत आला असून असला प्रकार आज प्रत्यक्षात कामठी शहरातील रविदास नगर येथील रास्त धान्य दुकानदारांकडून दिसून आला तेव्हा अशा महामारीच्या वाईट प्रसंगी गोरगरिबांचा घास गिळणाऱ्या दलालावर तसेच दोषी स्वस्त धान्य दुकांनदारावर कारवाही करण्यात यावी अशी तक्रार कांग्रेस चे महाराष्ट्र प्रदेश महासचिव व नागपूर जिल्हा परिषद चे माजी अध्यक्ष सुरेश भोयर यांनी तहसीलदार अरविंद हिंगे व पुरवठा निरीक्षक संदीप शिंदे यांच्याकडे केली आहे.

कामठी तालुक्यातील लाभार्थ्यांना धान्य वितरण व्हावे यासाठी एप्रिल ,मे व जून 2020 साठी दिलेल्या नियमित नियतना नुसार अन्नधान्य वाटप विहित दराने त्या त्या महिन्याच्या काळात वाटप करण्याचे आदेशित केल्या नुसार एप्रिल 2020 साठी अंत्योदय योजनेतील शिधापत्रिका धारकांना अन्न सुरक्षा योजने अंतर्गत असलेल्या 2 रुपए किलो गहू व 3 रुपये किलो तांदूळ या पाच रुपये किलो दराने 23 किलो गहू व 10 किलो तांदूळ प्रत्येक शिधा पत्रिका धारकांना त्या त्या महिन्यात वितरण करायचे आहे तसेच प्राधान्य कुटुंब योजनेतील प्रति लाभार्थ्यांना दरमहा 3 किलो गहू व 2 किलो तांदूळ वितरित करायचे आहे तसेच शिधापत्रिका वरील प्रति सदस्यांना 5 किलो मोफत तांदूळ वितरित करायचे आहे मात्र तालुक्यातील काही रास्त भाव दुकानदार चालू महिन्याचे धान्य रेशन कार्डावरील युनिट प्रमाणे न देता अडवणूक करून कुचंबणा करीत आहेत यासंदर्भात माजी जी प अध्यक्ष सुरेश भोयर यांनी तहसीलदार अरविंद हिंगे यांच्याकडे तक्रार करून त्या दोषी दुकांनदारावर कारवाही करण्याची मागणी केली आहे

संदीप कांबळे कामठी