Published On : Mon, Apr 12th, 2021

रेमडेसिवर इंनजेक्षण चा कृत्रिम तुटवता निर्माण करणाऱ्यांवर कारवाई करा

Advertisement

काँग्रेस कमिटीचे महासचिव उदयसिंग उर्फ गज्जु यादव यांची मागणी.

रामटेक – रेमडेसिवीर इंजेक्शनचा जिल्ह्यात कृत्रिम तुटवडा केला जाऊ नये, यासाठी अन्न व औषध प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात. या इंजेक्शनचा अवैधरित्या साठा करून ठेवल्याचे निदर्शनास आल्यास संबंधिताविरुद्ध कठोर कारवाई करावी, जिल्हा काँग्रेस कमेटीचे महासचिव उदयसिंग उर्फ गज्जू यादव यांची मागणी आहे.

जिल्ह्यातील रामटेक, पारशिवनी, कन्हान, मनसर, देवलापार परिसरात कोरोनामुळे परिस्थिती गंभीर झाली आहे. घराघरात रुग्ण आढळून येत असल्याने सर्वसामान्य नागरिक त्रस्त आहे. या भागात कोविड केअर सेंटर उपलब्ध नसल्याने नागरिकांना खासगी हॉस्पिटल किंवा नागपूरमध्ये धाव घ्यावी लागत आहे.

नागपूरमधील खासगी हॉस्पिटलमध्ये बेड खाली नसल्याने इकडून तिकडे फिरावे लागत आहे. एवढे सर्व करून रुग्णालयात बेड मिळाल्यानंतर रेमडेसिवीरअभावी उपचार योग्य होईलच याची शाश्‍वती मिळत नसल्याने जिल्ह्यातील कोरोनाबाधितांवर उपचारासाठी रेमडेसिवीर इंजेक्शनचा आवश्यक प्रमाणात व योग्य किंमतीत पुरवठा होणे आवश्यक आहे. मात्र, या इंजेक्शनचा कृत्रिम तुटवडा निर्माण करून त्याची चढय़ादराने विक्री होत असल्याच्या तक्रारी प्राप्त होत आहेत. त्यामुळे अन्न व औषध प्रशासनाने जिल्ह्यात आतापर्यंत रेमडेसिवीर इंजेक्शनचा किती पुरवठा झाला व त्यापैकी किती विक्री झाली, याची माहिती संकलित करावी.

तसेच या तपासणीदरम्यान इंजेक्शन विक्रीबाबत अनियमितता आढळून आल्यास संबंधित विक्रेत्यावर तातडीने नियमानुसार कडक कारवाई करावी. जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत नियुक्त पथकानेसुद्धा रेमडेसिवीर इंजेक्शनची विक्री करणार्‍या औषधी दुकानांना अचानक भेटी देऊन त्यांच्याकडून इंजेक्शन विक्रीच्या नोंदी योग्यप्रकारे घेतल्या जात असल्याची खात्री केल्यास साठेबाजांवर प्रशासनाचा अंकुश निर्माण होईल, असेही यादव यांचे मत आहे.