Published On : Mon, Apr 12th, 2021

क्रीडा समिती सभापती व्दारा दक्षिण नागपूर विधानसभा क्षेत्रातील

क्रीडा मैदानाची पाहणी

नागपूर, ता. १२ : नागपूर महानगरपालिका क्रीडा समिती सभापती प्रमोद तभाणे यांनी पदभार सांभाळल्यानंतर नागपूर शहरातील सहा विधानसभा क्षेत्रातील सहा क्रीडा मैदानांचा विकास करण्याचे उद्दीष्ठ ठरविलेले आहे. त्या अनुषंगाने आज सोमवार (ता.१२ एप्रिल) रोजी दक्षिणनागपूर विधानसभा क्षेत्राअंतर्गत येणा-या हनुमाननगर झोन क्रं.३ मधील चौकोणी क्रीडा मैदानाची आणि नेहरुनगर झोन क्र.५ मधील मिरे ले-आऊट येथील युवा सांस्कृतिक क्रीडा मैदानाची स्थायी समिती सभापती श्री. प्रकाश भोयर, क्रीडा सभापती श्री.प्रमोद तभाणे व उपसभापती श्री. लखन येरवार यांनी पाहणी केली.

चौकोणी क्रीडा मैदानात ग्रीन जीम साहित्य उपलब्ध करुन देण्याची प्रभाग ३१ च्या नगरसेविका उषा पॅलट यांनी सूचना केली. मिरे ले-आऊट येथील युवा सांस्कृतिक क्रीडा मैदानास चेजिंग रुम, शौचालय, बाथरुम, पाण्याची व्यवस्था इत्यादी सुविधांची गरज असल्याचे विरोधी पक्ष नेता तानाजी वनवे यांनी सूचित केले. स्थायी समिती अध्यक्ष श्री. प्रकाश भोयर यांनी या मैदानाचे नुतनीकरण करण्याची आवश्यकता असल्याचे मत व्यक्त केले.

प्रभाग २७ च्या नगरसेविका दिव्या धुरडे यांनी मैदान समतोल करणे आवश्यक असल्याची सुचना केली. उपरोक्त दोन्ही क्रीडा मैदानांकरीता आवश्यक सुविधांची पूर्तता करण्याचे क्रीडा सभापती यांनी संबंधित अधिकारी यांना निर्देश दिले.

या प्रसंगी प्रभागातील प्रतिष्ठीत नागरीक श्री.विजय गव्हाणे, मनोज वांढरे, संजय महाले, मनपाचे क्रीडा अधिकारी पियुष अंबूलकर आदी उपस्थित होते.