Published On : Sat, Sep 14th, 2019

ताई गोळवळकर महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी राबविले स्वच्छता अभियान”

रामटेक -ताई गोळवळकर विज्ञान महाविद्यालय रामटेक येथील राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांनी अनंत चतुर्दशी निमित्त होणाऱ्या गणेश मूर्तीच्या विसर्जन सोहळ्यानंतर साठणारे निर्माल्य व ओला व सुका कचरा यामुळे राखी तलाव व परिसर याठिकाणी “स्वच्छता अभियान” यशस्वीरित्या राबविले यामध्ये विद्यार्थ्यांनी अत्यंत शिस्तीने निर्माल्य व इतर स्वच्छता घडवून आणली .

विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम समन्वयक प्रा.चंद्रमोहन सिंह हेदेखील उत्स्फूर्तपणे सहभागी होते.

यावेळेस शिक्षकेतर कर्मचारी श्री देवेंद्र अवतारे उपस्थित होते .कार्यक्रम यशस्वीरित्या राबविले मुळे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.राजेश सिंगरू यांनी सर्वांचे अभिनंदन व कौतुक केले.