Published On : Fri, Sep 13th, 2019

राज्याचे अर्थमंत्री Sudhir Mungantiwar यांच्या गाडीला अपघात, थोडक्यात बचावले

Advertisement

चंद्रपूर: राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार शुक्रवारी रात्री साडे दहाच्या चंद्रपूर येथे झालेल्या अपघातातून थोडक्यात बचावले. बांबूने भरलेल्या भरधाव ट्रकने त्यांच्या गाडीला धडक दिली. मात्र ही भीषण दुर्घटना ड्रायव्हरच्या प्रसंगावधानामुळे टळली असून मुनगंटीवार यांच्यासह गाडीतील सर्वजण सुखरूप असल्याचं सूत्रांनी सांगितलं.

चंद्रपूर येथे बल्लापूरजवळ रात्री साडे दहाच्या सुमारास हा अपघात झाला. यावेळी गाडीमध्ये मुनगंटीवार यांच्यासह त्यांचे सहाय्यक आणि काही कर्मचारीही होते. बल्लारपूरजवळ बांबूने भरलेल्या एका भरधाव ट्रकने मुनगंटीवार यांच्या गाडीला जोरदार धडक दिली.

Gold Rate
21 Oct 2025
Gold 24 KT ₹ 1,22,500 /-
Gold 22 KT ₹ 1,13,900 /-
Silver/Kg ₹ 1,53,000/-
Platinum ₹ 60,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

मात्र मुनगंटीवार यांच्या चालकाच्या प्रसंगावधानामुळे मोठा अनर्थ टळला. या अपघातात कोणीही जखमी झाले नाही. मात्र मुनगंटीवार यांची गाडी डॅमेज झाल्याचं सूत्रांनी सांगितलं. हा अपघात झाल्याचं कळताच स्थानिक पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली असून पुढील कार्यवाही करत आहेत.

Advertisement
Advertisement