Published On : Wed, Feb 26th, 2020

स्वीडिश संसदीय प्रतिनिधीमंडळा च्या बैठकीत डॉ. विकास महात्मे

नागपुर-नवी दिल्ली येथे सोमवार ला स्वीडन च्या संसदीय प्रतिनधी मंडळाची Subordinate Legislation Committee (सीओएसएल), च्या राज्यसभा सदस्यांसोबत बैठक झाली. यावेळी राज्यसभा खासदार पद्मश्री डाॅ विकास महात्मे यांचे सोबतच इतर राज्यसभा खासदार श्री. नागर, श्री. राव, श्री. टी. सुब्बरामी रेड्डी सहभागी झाले होते.

पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांची स्वीडन भेट, तसेच मा. नितीनजी गडकरी यांची नुकतीच झालेली स्वीडन भेट यामुळे, भारत आणि स्वीडन यांच्यात उत्कृष्ट संबंध निर्माण झालेले आहेत. दोन्ही देशांमध्ये लोकशाही तसेच बहु-पक्षीय राजकीय व्यवस्था आहे. आपल्या देशातील लोकशाही व्यवस्था कशी कार्य करते ते जाणून घेणे हा त्यांच्या भेटीचा प्रमुख ऊद्देश्य होता.

याप्रसंगी दोन्ही देशांच्या प्रतिनिधिं मधे विचारांचे आदान प्रदान झाले तसेच संविधान, राज्यघटना इ . विषयांवर फलदायी चर्चा झाली.