Published On : Wed, Feb 26th, 2020

मत्स्य बोटूकली संचयनामुळे मासेमाऱ्यांच्या उत्पन्नात वाढ

रामटेक: रामटेक तालुक्यातील खिंडसी व पारशिवनी तालुक्यातील पेंच जलाशयात प्रथमच मत्स्य बोटूकली संचयन करण्यात आले.

रामटेक, पारशिवनी तालुक्यातील मत्स्य व्यवसाय दुप्पट करण्यासाठी मा. आमदार अँड. आशिष जयस्वाल यांच्या विशेष प्रयत्नाने मत्स्य बोटूकली संचयन करीता जिल्हा खनिज प्रतिष्ठान नागपूर मार्फत निधी मंजूर करून दिला.


यामुळे मत्स्य उत्पन्नात दुप्पट वाढ होऊन मासेमार बांधवांचे उत्पन्न वाढेल. यावेळी मत्स्य व्यवसाय विकास अधिकारी अशोक मोहोड, दीपक शिवरकर, जि.प. सदस्य संजय झाडे, दीपक चौहान, उमाशंकर बागडे,राहुल ढगे, टिकाराम परतेती, कमलेश शरणांगत, कृष्णाजी नागपुरे व इतर मच्छीमार बांधव उपस्थित होते.