Published On : Thu, Dec 5th, 2019

स्वीडनचे राजे कार्ल गुस्ताफ, महाराणी सिल्विया यांचे प्रयाण

मुंबई : स्वीडनचे राजे कार्ल गुस्ताफ आणि महाराणी सिल्विया यांचे दोन दिवसांच्या मुंबई भेटीनंतर सकाळी 7.45 वाजता छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन डेहराढूनकडे प्रयाण केले.

याप्रसंगी निरोप देण्यासाठी विमानतळावर मुख्य राजशिष्टाचार अधिकारी नंदकुमार व उपसचिव (राजशिष्टाचार) उमेश मदन, अप्पर पोलीस आयुक्त ज्ञानेश्वर चव्हाण (संरक्षण व सुव्यवस्था) आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.