Published On : Thu, Dec 5th, 2019

‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात उद्योग संचालनालयाचे आयुक्त डॉ. हर्षदीप कांबळे

मुंबई : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात ‘राष्ट्रनिर्मितीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे योगदान’ या विषयावर उद्योग संचालनालयाचे विकास आयुक्त डॉ. हर्षदीप कांबळे यांची विशेष मुलाखत प्रसारित होणार आहे.

ही विशेष मुलाखत दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर मंगळवार दिनांक 6 डिसेंबर 2019 रोजी संध्याकाळी 7. 30 वाजता प्रसारित होईल. निवेदक राजेंद्र हुंजे यांनी ही मुलाखत घेतली आहे.

देशाच्या जडणघडणीत डॅा बाबासाहेबांचे योगदान, कामगार मंत्री म्हणून डॉ. बाबासाहेबांनी केलेले कार्य त्याचबरोबर औरंगाबादमध्ये झालेली तीन दिवसीय जागतिक बैाध्द धम्म परिषदेची माहिती डॅा. कांबळे यांनी ‘जय महाराष्ट्र’ या कार्यक्रमातून दिली आहे.