Published On : Mon, Jan 22nd, 2018

स्वीडन तंत्रज्ञानाने होईल १० टक्के डिझेलची बचत


नागपूर: जगभरासमोर प्रदूषण ही मोठी समस्या आहे. इंधनाच्या वापराने होणाऱ्या प्रदूषणाचेही प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. यावर पर्याय म्हणून केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून आणि मनपाचे परिवहन समिती सभापती बंटी कुकडे यांच्या प्रयत्नातून नागपूर महानगरपालिकेद्वारे संचालित ‘आपली बस’च्या तीन बसेसमध्ये प्रयोगिक तत्त्वावर स्वीडन तंत्रज्ञान वापरण्यात येणार आहे. या तंत्रज्ञानामुळे १० ते १५ टक्के इंधनाची बचत होणार असल्याचे कंपनीने म्हटले आहे.

सोमवारी (ता. २२) स्वीडनच्या शिष्टमंडळाने केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व परिवहन सभापती बंटी कुकडे यांची भेट घेऊन सादरीकरण केले. यामध्ये स्वीडन कंपनी (ईपीएस)चे व्यवस्थापकीय संचालक डेनिस अब्राहम, मार्केटिंग ॲनालिस्ट ॲना काई आणि बिझनेस डेव्ह्लपमेंट विभागाच्या दिव्याणी अशोक कुबडे यांची उपस्थिती होती. मनपातर्फे परिवहन समिती सभापती बंटी कुकडे, परिवहन व्यवस्थापक शिवाजी जगताप यांनी सादरीकरणाद्वारे तंत्रज्ञानाची माहिती जाणून घेतली.

शुद्ध पाण्यासाठी आता ‘वॉटर एटीएम’
शहरातील नागरिकांना शुद्ध पिण्याचे पाणी मिळावे या उद्देशाने जोसेब इकोलॉजिकल कंपनीतर्फे शहरातील ज्या भागात पाण्याचे नेटवर्क नाही अशा भागासाठी वॉटर एटीएमचा पर्याय उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. यामध्ये प्रायोगिक तत्त्वावर वाठोडा येथे ‘वॉटर एटीएम’ लावण्यात येईल. यामध्ये नैसर्गिक पद्धतीने पाणी शुद्धीकरण केल्या जाईल, हे विशेष. या एटीएमला पाच हजार लिटर क्षमतेची पाण्याची टाकी राहणार असून दर तास एक हजार लिटर पाणी वापरता येणार आहे.

Gold Rate
18 Aug 2025
Gold 24 KT ₹ 1,00,100 /-
Gold 22 KT ₹ 93,100 /-
Silver/Kg ₹ 1,15,400/-
Platinum ₹ 48,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above
Advertisement
Advertisement