Published On : Thu, Jul 11th, 2019

स्वामी अवधेशानंद शाळेत पद व शपथ ग्रहण समारोह

कामठी :-श्री सदाशिवराव पाटील शिक्षण संस्थे द्वारा संचालित स्वामी अवधेशानंद पब्लिक स्कूल येथे वर्ग प्रमुख व् शाळा प्रमुख निवडलेल्या विद्यार्थ्यांना पद व शपथ ग्रहण समारंभाचे आयोजन करण्यात आले.

शाळेच्या प्राचार्य ईशा मुदलीयार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणुन पत्रकार बंडू नारनवरे, उप प्राचार्य अविनाश धोटे उपस्थित होते. यावेळी विद्यार्थ्यांना बेचेस लावून त्यांना त्यांच्या जबाबदारी ची जाणीव करून देण्यात आली. शाळेच्या प्राचार्या ईशा मुदलियार यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात विद्यार्थ्यांना शुभेच्छया दिल्या. हे पद शक्तीचे नाही तर जबाबदारी चे धोतक आहे.

सर्व विद्यार्थ्यांकडून अपेक्षा आहे की त्यांनी या जबाबदारी चे निर्वाह कुशलतापूर्वक करावे, असे आवाहन त्यांनी या वेळी केले.कार्यक्रमाचा प्रारंभ दिप प्रज्वलन करून व् विद्यार्थिनीं द्वारा स्वागत नृत्य सादर करून करण्यात आले.कार्यक्रमाचे संचालन सुषमा गायकवाड व आभार प्रदर्शन ममता बरबटे यांनी केले. यावेळी क्रीडा शिक्षक कृष्णन पिल्लै, सपना नांदुरकर, सीमा गडकरी, सपना अनवाणी, संपा सरकार, रंजना ठाकरे, रिना चहांदे, यांच्या सह शाळेच्या इतर शिक्षिका व् विद्यार्थी उपस्थित होते.