Published On : Sun, Jan 13th, 2019

स्वामि विवेकानंद जयंती निमित्य अ.भा.वि.प. रामटेक तर्फे रक्तदान शिबिर संपन्न.

रामटेक: अखिल भारतिय विद्यार्थी परिषद ,रामटेक येथे राजिव गांधी सभागृहा मध्ये रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते या शिबिराच्या उद्घाटना प्रसंगी अ.भा.वि.प. नगरअध्यक्ष सिंग सर, उपाध्यक्ष सिंगरु मॅडम, नगराध्यक्ष दिलीपजी देशमुख, जिल्हा परिषद उपाध्यक्ष शरद डोनेकर, नगरसेवक आलोक मानकर, समाजसेवक गोपि कोल्हेपरा , राजेश शाहु, रितेश शर्मा, अमोल खडोतकर , कामरान जाफरी व अन्य मान्यवर उपस्थित होते.

आपल्या प्रास्ताविका मध्ये सिंग सरांनि म्हटले की, एबीवीपी ही स्वामि विवेकानंद यांच्या विचारांना घेवुन निरंतर विद्यार्थी व समाजहितपयोगी उपक्रम राबवित असते. अ.भा.वि.प. ही युवकांमध्ये राष्ट्रभक्तीचा अलख व स्वामिजींचे विचार पोहचविण्याचे कार्य करीत आहे. या शिबिराला उत्स्फुर्त असा प्रतिसाद मिळाला. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन मोहित कक्कड यांनि केले तर शिबिर प्रसंगी श्रुतीका, ऋतुजा, दिक्षा, प्राजक्ता, रिद्धी,दामिनी,शांतनु ,कर्ण,प्रणय,प्रमोद,प्रतिक्षा, जयश्री ,गौरव,योगेश, रविशंकर, आर्यन, आयुष, सत्यम, नचिकेत व अमोल पवार आणी अ.भा.वि.प. चे सर्व प्रमुख कार्यकर्ता हजर होते.