Published On : Fri, Nov 25th, 2022

स्वच्छ भारत अभियान : प्लास्टिक विरुध्द मनपाची कारवाई

नागपूर : स्वच्छ भारत अभियान अंतर्गत नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने शुक्रवारी (ता.25) 5 प्रतिष्ठानांवर कारवाई करून 30 हजार रुपयांचा दंड वसूल केला. मनपा आयुक्त तथा प्रशासक श्री. राधाकृष्णन बी. यांच्या मार्गदर्शनात धंतोली आणि मंगळवारी झोनच्या उपद्रव शोध पथकाद्वारे प्रतिबंधित प्लास्टिक पिशवी संदर्भात 3 प्रतिष्ठानांवर कारवाई करून 20,000/- रुपयांचा दंड वसूल करण्यात आला तसेच 13 किलो प्लास्टिक जप्त करण्यात आले.

उपद्रव शोध पथकाने प्लास्टिक पिशवीच्या वापराबद्दल धंतोली झोन अंतर्गत कॉटन मार्केट येथील महालक्ष्मी डिस्पोझल या दुकानाविरुध्द कारवाई करून 10 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. आणि महालक्ष्मी भंडार या दुकानाविरुध्द कारवाई करून 5 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. मंगळवारी झोन अंतर्गत मंगळवारी मार्केट येथील पॉझिटीव्ह टी स्टॉल या दुकानाविरुध्द कारवाई करून 5 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.

Advertisement

त्याचप्रमाणे धरमपेठ झोन अंतर्गत यशवंत स्टेडियम, धंतोली येथील टपरी चाय कप यांच्याविरुध्द कचरा टाकणे आणि अनधिकृत जागेवर पाणी व चिखल पसरविल्याबद्दल कारवाई करून 5 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. आशिनगर झोन अंतर्गत ठवरे कॉलनी येथील ओमप्रकाश सुखदेव यांच्याविरुध्द लग्नाचा कार्यक्रम बंद झाल्यानंतर टाकाऊ पदार्थ/जेवण मोकळया जागेवर पसरविल्याबद्दल कारवाई करून 5 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. ही कारवाई उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या नेतृत्वात करण्यात आली.

Advertisement
Advertisement
Advertisement