Published On : Fri, Nov 25th, 2022

मनपाच्या भव्य वॉल पेंटिंग स्पर्धा नोंदणीला उदंड प्रतिसाद

३ ते ५ डिसेंबर दरम्यान स्पर्धा
स्वयंस्फूर्तीने सहभागी होणायचे अतिरिक्त आयुक्त राम जोशी यांचे आवाहन

नागपूर : . स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्य नागपूर महानगरपालिकेच्या वतीने शहरातील शासकीय व निम शासकीय इमारतीच्या कुंपण भिंतीवर मोक्याच्या ठिकाणी भित्ती चित्र रेखाटन स्पर्धेचे (wallpainting competition) आयोजन ३ डिसेंबर २०२२ ते ५ डिसेंबर २०२२ दरम्यान करण्यात आले आहे. स्पर्धेबाबत नागरिकांमध्ये उत्साह असून स्पर्धेसाठी नोंदणीला स्पर्धकांचा उदंड प्रतिसाद दिसून येत आहे. आजवर १७५ हुन अधिक गट (५ ते ७ चित्रकारांचा समूह) यांनी स्पर्धेसाठी नोंदणी केली आहे. तरी स्पर्धेत चित्रकार विद्यार्थी आणि व्यवसायिक चित्रकारांनी स्वयंस्फूर्तीने मोठ्या संख्येत सहभागी नोंदवावा असे आवाहन मनपाचे अतिरिक्त आयुक्त श्री. राम जोशी यांनी केले आहे.

Advertisement

शहर सौंदर्यीकरणाच्या दृष्टीने नागपूर महानगरपालिकेद्वारे भव्य वॉल पेंटिंग स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा महाविद्यालयीन विद्यार्थी गट आणि व्यावसायिक चित्रकार अशा दोन गटामध्ये घेण्यात येणार आहे. चित्रकारांना स्वच्छ भारत अभियानावर आधारित ३२ विषयाला अनुसरून शासकीय व निमशासकीय इमारतीच्या भिंतीवर चित्र काढायचे आहे. तसेच दर्शनीय खासगी भिंतींवर त्यांच्या अनुमतीने चित्र काढायचे आहेत. याकरिता चित्रकाराला सहमती घेणे आवश्यक आहे. यात चार ते पाच कलावंतांचा व विद्यार्थ्यांचा गट तयार करून भित्तीचित्र काढावयाचे आहे. स्पर्धेचे साहित्य सामग्री आयोजकाकडून पुरविण्यात येणार आहे. स्पर्धकांसाठी नमूद केलेल्या कालावधीतच भित्तीचित्र पूर्ण करणे अपेक्षित असून, प्रत्येक कलावंताला सहभाग प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. ज्या भिंतीवर पेंटिंग केली जाईल ती भिंत १० मीटर लांबीची असणे आवश्यक आहे.

चित्रकला महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी त्यांच्या महाविद्यालयातून स्पर्धेची नोंदणी करावयाची आहे. व्यावसायिक चित्रकारांनी आपली नोंदणी शासकीय चित्रकला महाविद्यालय दीक्षाभूमी येथे करावी. महाविद्यालयीन विद्यार्थी चित्रकारांच्या चित्रांची त्यांच्या महाविद्यालयीन प्राध्यापक किंवा आयोजकामार्फत निवड करावी. पुरस्कारांची निवड पुरस्कार निवड समितीतर्फे करण्यात येणार आहे. पुरस्कार वितरणाची तारीख व दिवस स्पर्धकांना मोबाईलद्वारे कळविण्यात येणार आहे. सर्व चित्रकला महाविद्यालयातर्फे आलेल्या स्पर्धक प्रवेशिका त्वरित स्वच्छ भारत अभियान कक्ष, महानगरपालिका, नागपूर यांना सुपुर्द करण्यात यावे, असे श्री. राम जोशी यांनी सांगितले.

चित्रकला महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी या स्पर्धेसाठी उत्स्फूर्त प्रतिसाद दर्शविला आहे. तरी ज्या स्पर्धकाला स्पर्धेत नाव नोंदणी करायची असेल, त्यांनी अधिक माहितीसाठी स्पर्धेचे समन्वयक श्री. राजकुमार बोंबाटे, मो. ९९२३५९४७७१, ९५१८५८१००३ आणि श्री. सूर्यकांत मंगरूळकर मो. ९४२२८१०९३४, ८२०८८७३८२५ यांच्याशी त्वरित संपर्क साधावा, असेही आवाहन श्री. राम जोशी यांनी केले आहे.

स्पर्धेचे विषय
क्लिन हेरिटेज ऑफ नागपूर, क्लिन ऑरेंज सिटी, क्लिन टायगर कॅपिटल ऑफ इंडिया, ग्रीन सिटी, क्लिन झिरो माइल, क्लिन रिलीजियस प्लेसेस (उदा. गणेश टेकडी दीक्षाभूमी आदी.) क्लीन वॉटर बॉडी, स्पेशल फेस्टिवल ऑफ नागपूर( उदा. मारबत.)

क्लीन मार्केट. डोअर टू डोअर कलेक्शन. सोर्स सेगरीगेशन. Wet, dry, sanitary and domestic hazardous waste.

Littering garbage vulnerable points. प्रोसेसिंग बाय वर्क वॉटर जनरेटर्स. होम कंपोस्टिंग. प्लास्टिक बॅन प्लास्टिक फ्री नागपूर. सी अँड डी वेस्ट. शहर सौंदर्यीकरण (सिटी ब्युटीफिकेशन). थ्री आर प्रिन्सिपल्स ( रेडिओज, रियूज, रिसायकल).

ई वेस्ट मॅनेजमेंट. डेली वेस्ट कलेक्शन फ्रॉम हाऊसहोल्ड/ इस्टॅब्लिशमेंट /इन्स्टिट्यूशन. क्लीन नेबरहूड. पब्लिक टॉयलेट ऑन गुगल मॅप्स. क्लीन सिटी. पीपल बिहेवियर मॅनेजिंग देअर वेस्ट रिस्पॉन्सिबिलिटी. ओपन डेफिनेशन अँड ओपन urination.

अक्सेसेबल अँड क्लीनर कम्युनिटी अँड पब्लिक टॉयलेट. इशूज रिगार्डिंग चोक सीव्हीआर लाईन ऑर desluding of septic tank handled on priority. सॅनिटरी वर्कर्स बेरिंग सेफ्टी गिअर्स. स्वच्छता संदेश ( अवेअरनेस मेसेज). कापडी पिशवी (कॅरिंग क्लोथ बॅग). आदी विषय.

Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement

Advertisement
Advertisement
Advertisement

 

Advertisement
Advertisement
Advertisement