Published On : Mon, May 2nd, 2022
By Nagpur Today Nagpur News

स्वच्छ भारत अभियान : शोध पथकाची कारवाई

Advertisement

नागपूर : स्वच्छ भारत अभियान अंतर्गत नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने सोमवारी (ता.2) रोजी 04 प्रतिष्ठानांवर कारवाई करून 20 हजार रुपयांचा दंड वसूल केला. मनपा आयुक्त राधाकृष्णन बी यांच्या मार्गदर्शनात धरमपेठ झोन अंतर्गत डब्ल्यू.एच.सी.रोड, धरमपेठ येथील श्री कृष्णा आयुर्वेदीक दवाखाना यांच्याविरुध्द परवानगीशिवाय बॅनर्स आणि होर्डिंग लावल्याबद्दल कारवाई करून 5 हजार रुपयांचा दंड वसुल केला. नेहरुनगर झोन अंतर्गत जगनाडे चौक, नंदनवन येथील 7 स्टार कॅटरिंग कडुन वाया जाणारे अन्न रस्त्यालगत टाकल्यामुळे कारवाई करुन 5 हजार रुपयाचा दंड वसुल केला.

त्याचप्रमाणे गांधीबाग आणि लकडगंज झोनच्या उपद्रव शोध पथकाद्वारे प्रतिबंधित प्लास्टिक पिशवी संदर्भात कारवाई करण्यात आली.

Gold Rate
Feb20 th, 2026 - Time 11.45Hrs
Gold 24 KT ₹ 1,54,400 /-
Gold 22 KT ₹ 1,44,500 /-
Silver/Kg ₹ 2,47,200 /-
Platinum ₹ 90,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

पथकाने गांधीबगा झोन अंतर्गत ईतवारी भंडारा रोड येथील जगदंबा प्लास्टिक या दुकानाविरूध्द प्लास्टिक पिशवीच्या वापर केल्याबद्दल कारवाई करून 5 हजार रुपयांचा दंड वसुल केला. तसेच लकडगंज झोन अंतर्गत एच.बी.टाऊन कळमना रोड येथील केक विला या दुकानाविरूध्द प्लास्टिक पिशवीच्या वापर केल्याबद्दल कारवाई करून 5 हजार रुपयांचा दंड वसुल केला. ही कारवाई उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या नेतृत्वात करण्यात आली.

GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Advertisement
Advertisement