Published On : Tue, Feb 6th, 2018

सभापती मनोज चापले यांनी घेतला स्वच्छतेसंदर्भात आढावा

Advertisement

नागपूर: पुढील आठवड्यात शहरात स्वच्छ सर्वेक्षण सुरू होणार आहे. त्यापार्श्वभूमीवर शहरातील स्वच्छतेसंदर्भातील आढावा नागपूर महानगरपालिकेच्या वैद्यकीय सेवा व आरोग्य समिती सभापती मनोज चापले यांनी मंगळवारी (ता.६) ला मनपा मुख्यालयातील डॉ.पंजाबराव देशमुख सभागृहात आयोजित बैठकीत घेतला.

बैठकीला समिती सदस्य लखन येरावार, विजय चुटेले, विशाखा बांते, भावना लोणारे, आशा नेहरू उईके, वंदना चांदेकर, आरोग्य अधिकारी (स्वच्छता) डॉ.प्रदीप दासरवार, वैद्यकीय अधिकारी डॉ.विजय जोशी, हत्तीरोग व हिवताप विभाग प्रमुख जयश्री थोटे प्रामुख्याने उपस्थित होते.

यावेळी मागील जानेवारी महिन्याच्या सभेत ठरलेल्या कार्यवाहीला मंजूरी देण्यात आली. आरोग्य विभागाद्वारे स्वच्छतेसंदर्भातील केलेल्या कामाचा सभापतींनी झोननिहाय आढावा घेतला.

मनपाच्या ठरावानुसार ओपीडी क्लिनिक व्यवसायिक नामांकनासाठी सर्वंसमावेशक धोरण ठरविण्याबाबत चर्चा करण्यात आली. सभेत ठरल्याप्रमाणे नामांकनासाठी शुल्क आकरण्यात येत आहे. हे शुल्क एप्रिल २०१८ पासून आकरण्यात यावे, असे निर्देश सभापती चापले यांनी दिले. तसेच क्लिनिक नामांकनासाठीची एक नवीन समिती गठीत करण्यात यावी, ज्यात सभापती अध्यक्ष असतील. त्या समितीमध्ये उपायुक्त, स्वच्छता अधिकारी, एक नगररचना विभागाचा प्रतिनिधी, एक आयएमएचा प्रतिनीधीचा समावेश असेल, असे निर्देश सभापती चापले यांनी दिले. ही संयुक्त समिती गठीत झाल्यावर निर्णय घेऊऩ मनपाच्या सर्व साधारण सभेपुढे मंजूरीकरीता पाठविण्यात यावी, असे आदेश चापले यांनी दिले. यानंतर सभापतींनी स्वच्छ भारत अंतर्गत केलेल्या कार्यवाहीचा आढावा घेतला. हत्तीरोग व हिवताप विभागाची माहिती जयश्री थोटे यांनी दिली. कनक संदर्भात नगरसेविकांनी केलेल्या तक्रारींचा निपटारा दोन दिवसात करण्याचे निर्देशदेखील सभापती चापले यांनी दिले.