Published On : Tue, Feb 26th, 2019

जिल्हा परिषद कोयला खदान शाळेचे सुयश

कन्हान : – नागपूर जिल्हा परिषदेमार्फत जिल्हास्तरीय क्रिडा व सांस्कृतिक स्पर्धेचे अायोजन जिल्हा परिषद शाळा, चिरवा पंचायत समिती मौदा येथे करण्यात आले होते. हि स्पर्धा १५ व १६ फेब्रुवारी रोजी पार पडली. या स्पर्धेत २०० मीटर दौडमध्ये जि. प. उच्च प्राथमिक शाळा कोयला खदान येथील सातवीतल्या रोहीत किशोर सुर्यवंशी याने उपविजेताचे पारितोषिक प्राप्त केले.

बक्षिस वितरण समारंभात पालकमंञी चंद्रशेखर बावणकुळे, जि.प.अध्यक्षा निशा सावरकर, मुख्य कार्यकारी अधिकारी संजय यादव, शिक्षण सभापती उकेश चौव्हाण, शिक्षणाधिकारी चिंतामण वंजारी, चिरवाच्या सरपंच सौ. तिजारे यांच्या उपस्थितीत रोहित सुर्यवंशी व क्रीडा शिक्षक प्रेमचंद राठोड याचा सत्कार करण्यात आला.

यश प्राप्त करण्यासाठी शाळेच्या मुख्याध्यापिका शुभांगी चंदनखेडे, क्रिडाशिक्षक प्रेमचंद राठोड, अभिषेक कांडलकर, मधूमती नायडू, सारीका वरठी, रिदवाना शेख यांनी मोलाचे मार्गदर्शन केले.