Published On : Fri, Sep 20th, 2019

महावितरणची नाट्यस्पर्धा नव्हे तर उत्सव – सुरेश मडावी

नागपूर: महवितरणची ही नाट्यस्पर्धा, स्पर्धा नव्हे तर उत्सव आहे, त्यामुळे पूर्ण सर्व कर्मचा-यांनी उत्साहासह हा उत्सव साजरा करा, खेळीमेळीच्या वातावरणात प्रत्येक प्रुयोगाचा आनंद घ्या. असे आवाहन अमरावती येथे अयोजित प्रादेशिकस्तरीय आतरपरिमंडलीय नाट्य स्पर्धेच्या उद्घाट्न कर्यक्रमाचे अध्यक्ष सुरेश मडावी यांनी केले. या नाट्यस्पर्धेचे उद्घाटन श्रीमती अर्चना घुगल यांच्या हस्ते स्थानिक संत ज्ञानेश्वर सभागृह येथे आज दि. 20 रोजी करण्यात आले.

दोन दिवस चालणा-या या नाट्यस्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी दिलीप खानंदे, अनिल वाकोडे, शरद दाहेदार, राहुल बोरीकर, रुपेश देशमुख, वैभव थोरात, मधुसूदन मराठे, परीक्षक – आशा देशमुख, डॉ अनंत देव, ऍड चंद्रशेखर डोरले आदी ,आन्यवर उपस्थित होते. कर्यक्रमाचे संचालन प्रदीप अंधारे तर आभार प्रदर्शन भारतभूषण अवघड यांनी केले. तदनंतर तीन नाट्यप्रयोगाचे सादरीकरण करण्यात आले.

मनोविश्लेषणात्मक नाट्यप्रकारातील ‘त्या तिघांची गोष्ट’ चा नाट्यप्रयोग महावितरणच्या नागपूर परिमंडलातर्फ़े स्पर्धेच्या प्रथम सत्रात आज सादर करण्यात आला. डॉ. आनंद नाडकर्णी यांच्या सशक्त लेखणिने विभक्त आई-वडील आणि मुलगी या तिघांतील ताणतणाव व पेच अत्यंत टोकदारपणे रेखाटणा-या कुणा एकाची बाजू न घेता त्यांना परस्परांसमोर उभं केलं आहे. मानवी नात्यांतील अंधाऱ्या गुहा, त्यांतील निरगाठी हा त्यांचा अभ्यासविषय असल्यानं अत्यंत परिणामकारकपणे नाटकातील घटना-प्रसंगांची गुंफण यात आहे. आजच्या व्यक्तिकेंद्री जगण्याचा पंचनामा करतानाच मानवी नातेसंबंधांतील अनावश्यक तिढय़ांचं प्रत्ययकारी दर्शन देणारे, दुरावलेल्या आई-वडिलांच्या मुलीची व्यथावेदना आणि वंचना दिप्ती अर्थातच नेहा हेमणे हिने मुखर केली आहे. सुमित खोरगडे यांनी बुद्धिमान, महत्त्वाकांक्षी, धूर्त, मुत्सद्दी, तितकाच हळवा, सरळ मनाचा पिता.. दीनानाथ उत्कटपणे साकारला आहे. गोळीबंद संवादफेक आणि प्रभावी व्यक्तिमत्त्व ही त्यांची खासीयत इथंही प्रत्ययाला येते. नवऱ्याच्या हिशेबी धूर्तपणाचे जीवघेणे चटके सोसल्यानं संशयी, कठोर आणि काहीशी भावनाहीन बनलेली सुमन- स्नेहांजली पानसे यांनी लाजवाब वठवली आहे. त्यांच्या धारदार संवादफेकीचाही यात मोलाचा वाटा आहे. मंगेशच्या भूमिकेत जयंत बाणेरकर सहज वावरले आहेत. अविनाश लोखंडे यांचे नानाही चोख. अश्या या प्रगल्भ, परिपक्व अभिनय संपन्न ‘त्या तिघांची गोष्ट’ ने सभागृतातील नाट्यरसिकांना अखेरपर्यंत बांधुन ठेवले होते.

महावितरणच्या नागपूर परिमंडलाचे मुख्य अभियंता दिलीप घुगल यांची सशक्त निर्मितीत, दिग्दर्शक नारायण आमझरे यांनी संहितेतील धारदार तणाव प्रयोगात तितक्याच उत्तमरीत्या आविष्कृत केलेला आहे. प्रत्येक पात्राचं ‘व्यक्तिमत्त्व’ सर्वागानं सामोरं येईल याची दक्षता त्यांनी घेतली आहे. नाटकातील भावप्रक्षोभक क्षण त्यांनी संयमितपणे हाताळले आहेत. दिलीप दोडके यांचे व्यवस्थापन आणि अजय कोलते यांनी उभारलेला सुमनचा फ्लॅट तिच्या भक्कम आर्थिक स्थितीचा निदर्शक आहेच; त्याचबरोबर शहराचं अंतरंगही साकारणारा आहे. पंकज होनाडे यांच्या पाश्र्वसंगीताने नाटय़ांतर्गत ताण अधिक गडद केला आहे. प्रशांत ठाकरे यांच्या प्रकाशयोजनेचीही त्यास साथ लाभली आहे. रसिका भोळे यांनी नाटकातील घटना-प्रसंगानुसारी रंगभूषा व वेषभुषा पात्रांना केली असल्याने प्रेक्षकांनीही या नाटकाला भरभरुन दाद दिली.