मुंबई: राज्यातील उष्म्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. आठ दिवसांपूर्वी राज्यात उष्माघातावर उपचार घेणाऱ्यांची संख्या १४९ होती. आरोग्यभवनाकडून मिळालेल्या माहितीनुसार राज्यातील विविध रुग्णालयांत दोनशेंहून अधिक रुग्णांना उष्माघाताच्या उपचारांसाठी दाखल करण्यात आले आहे.
उष्माघाताचा पहिला बळी अमरावती येथे नोंदवण्यात आला आहे. तर गेल्या वर्षी उष्माघातामुळे महाराष्ट्रात १३ जणांना प्राण गमावावे लागले होते.
उष्माघातावर उपचार घेणाऱ्यांची संख्या नागपूर भागात सर्वाधिक म्हणजे १२९ इतकी असल्याची माहिती राज्याच्या आरोग्य संचालनालयाकडून देण्यात आली.