Published On : Wed, Aug 14th, 2019

सनी देओल यांनी घेतली नागपुरात गडकरींची भेट

नागपूर : चित्रपट अभिनेता व खासदार सनी देओल यांनी मंगळवारी केंद्रीय भूपृष्ठ परिवहन वाहतूक तसेच सुक्ष्म व लघु उद्योग मंत्री नितीन गडकरी यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. सनी देओल यांनी गडकरी यांच्या प्रकृतीबाबत आस्थेने विचारपूस केली आणि राजकीय व इतर विषयावर चर्चा केली. त्यांनी गडकरी कुटुंबासोबत स्नेहभोजनही केले.

मातृभूमी प्रतिष्ठान, रेशीमबागतर्फे बुधवारी सकाळी होणाऱ्या सामूहिक वंदेमातरम कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी सनी देओल नागपूरला आले आहेत. रात्री डॉ. बाबासाहेब आंतरराष्ट्रीय विमानतळावर पोहचल्यानंतर ते थेट रात्री ९.१५ वाजताच्या दरम्यान नितीन गडकरी यांच्या रामनगर येथील निवासस्थानी पोहचले. गडकरी यांनी त्यांना घरी भोजनाचे निमंत्रण दिले होते व सनी यांनी ते सहर्ष स्वीकारले. घरी पोहचल्यानंतर गडकरी यांनी त्यांचे स्वागत केले.

Gold Rate
22 Sept 2025
Gold 24 KT ₹ 1,11,200 /-
Gold 22 KT ₹ 1,03,400 /-
Silver/Kg ₹ 1,33,000/-
Platinum ₹ 48,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

यावेळी गडकरी यांच्या पत्नी कांचन गडकरी व मातृभूमी प्रतिष्ठानचे छोटू भोयर उपस्थित होते. यानंतर सनी देओल यांनी गडकरी कुटुंबाच्या कुलदेवतेचे दर्शन घेतले. त्यांनी गडकरी यांच्या प्रकृतीची चौकशी केली व देशहितासाठी काम करताना आपल्या प्रकृतीकडे लक्ष देण्याची विनंती केली. राजकीय व इतर विविध विषयावर काही काळ चर्चा केल्यानंतर त्यांनी गडकरी व कुटुंबासोबत स्नेहभोजन घेतले. सनी देओल जवळपास दोन तास गडकरी यांच्या निवासस्थानी होते व त्यानंतर ते थेट हॉटेलकडे रवाना झाले.

Advertisement
Advertisement