Published On : Fri, Jan 3rd, 2020

आमदार सुनील केदार कॅबिनेट मंत्री बनताच सर्वात प्रथम रामधामला भेट

ढोल ताश्यासह फटाक्यांची आतिषबाजी करत हर्षोल्लासात चाहत्यांनी केले स्वागत .

रामटेक : -महाराष्ट्रात महा विकास आघाडी सरकारच्या शपथग्रहण कार्यक्रमात सावनेर विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेसचे आमदार सुनील केदार यांना कॅबिनेट मंत्री पदाचा दर्जा मिळाला.

यानिमित्ताने रामधम मनसर येथे फटाक्यांची आतिषबाजी करून ब्यांड बाज्यासह पुष्पांनी सुनील केदार साहेबांचे स्वागत चाहत्यांनी केले.

यावेळी पर्यटक मित्र ,काँग्रेसचे नेते, रामधामचे संस्थापक, रोजगार निर्मितीचे महामेरू चंद्रपाल चौकसे यांनी सुनीलबाबू केदार यांचे स्वागत करून त्यांना शुभेच्छा दिल्या. सुनील केदार मंत्री होताच प्रथमच रामधामला भेट दिली व आशीर्वाद घेतला .

ह्यावेळी महाराष्ट्र राज्याचे नवनियुक्त कैबिनेट मंत्री मा.ना.सुनील बाबु केदार यांचा पत्रकार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी रामधाम येथे प्रथम आगमणानिमित्त स्वागत केले .

जिल्हाध्यक्ष तथा टी. व्ही चॅनल व प्रेस रिपोर्टर राकेश मर्जीवे तसेच टी. व्हीं न्युज चॅनेल व प्रेस रिपोर्टर नागपूर जिल्हा कार्यकारी अध्यक्ष सुषमा मर्जिवे ,महासचिव वैशाली सहारे, उपाध्यक्ष शितल चिंचोलकर व पत्रकारांनी कॅबिनेट मंत्री सुनील केदार यांचे स्वागत करून त्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी प्रामुख्याने महिपाल चौकसे,उदयसिंग यादव ,
नागपुर डिस्ट्रिक्ट बँकेचे माजी संचालक तथा काँग्रेसचे नेते डॉक्टर रामसिंग सहारे, काँग्रेसचे नेते पी टी रघुवंशी, सचिन किरपान,असलम शेख, नितीन भैसारे,अजय खेडगरकर , श्रिधर झाडे, दयाराम भोयर, अशोक चिखले व युवा काँग्रेसचे पदाधिकारी यांनी तसेच सुनील केदार यांच्या चाहत्यांनी मंत्री झाल्याबद्दल जल्लोष करून त्यांचा स्वागत सत्कार केला .संचालन मोहन कोठेकर यांनी केले.