Published On : Tue, Apr 28th, 2026
By Nagpur Today Nagpur News

नागपुरात पोलिस कर्मचाऱ्याची आत्महत्या; पत्नी व कथित प्रियकरावर गंभीर आरोप, तपास सुरू

Advertisement

नागपूर : शहरातील अंबाझरी पोलीस ठाणे हद्दीत एका पोलिस कर्मचाऱ्याने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. कथित मानसिक छळाला कंटाळून हा टोकाचा निर्णय घेतल्याची माहिती समोर येत असून, या प्रकरणी पोलिसांनी मृताच्या पत्नीविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करून तिला अटक केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मृत पोलिस कर्मचाऱ्याची ओळख ४५ वर्षीय शीलरत्न भीमराव बेलेकर अशी असून ते प्रतापनगर पोलीस ठाण्यात कार्यरत होते. ते इसासनी परिसरातील वाघदरा भागात वास्तव्यास होते. गेल्या काही काळापासून ते कौटुंबिक वादामुळे मानसिक तणावात होते.

Gold Rate
Apr 28- 2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 1,52,000 /-
Gold 22 KT ₹ 1,41,400 /-
Silver/Kg ₹ 2,44,300/-
Platinum ₹ 90,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

तपासात उघडकीस आलेल्या माहितीनुसार, त्यांच्या पत्नी रुचिका बेलेकर (वय ३२) हिचे महेश नावाच्या व्यक्तीसोबत कथित संबंध असल्याची चर्चा होती. मागील दोन वर्षांपासून दोघांमध्ये जवळीक वाढल्याचे सांगितले जाते. ही बाब समजताच शीलरत्न बेलेकर यांच्या कुटुंबात वाद तीव्र झाला.

आरोपानुसार, रुचिका बेलेकर या सतत पतीवर घटस्फोट घेण्याचा आणि मालमत्ता आपल्या नावावर करण्याचा दबाव टाकत होत्या. यासोबतच मानसिक छळही केल्याचे सांगितले जात आहे. कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार, त्यांना वारंवार ‘मरण्याच्या’ सूचनाही दिल्या जात होत्या, त्यामुळे ते प्रचंड तणावाखाली होते.

दरम्यान, फेब्रुवारी महिन्यात शीलरत्न बेलेकर हे आपल्या भाऊ अजय बेलेकर यांच्या कामगार कॉलनीतील घरी राहण्यासाठी आले होते. काही दिवसांनी ते घराबाहेर पडले आणि त्यानंतर त्यांचा पत्ता लागला नाही. यानंतर त्यांच्या भावाने प्रतापनगर पोलीस ठाण्यात बेपत्ता असल्याची तक्रार नोंदवली होती.

२४ फेब्रुवारी रोजी अंबाझरी तलावात त्यांचा मृतदेह आढळून आला. सुरुवातीला आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली होती. मात्र, तपासात समोर आलेल्या बाबींनंतर आता आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा नोंदवून पुढील कारवाई सुरू करण्यात आली आहे.
पोलिसांनी मृताच्या पत्नीला अटक केली असून या घटनेचा सर्व अंगांनी सखोल तपास सुरू आहे.

GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Advertisement
Advertisement