Published On : Sat, Jul 27th, 2019

वारीसपुऱ्यात तरुणाची गळफास लावून आत्महत्या

कामठी : – काल एकाच दिवशी दोन वेगवेगळ्या ठिकाणी गळफास होऊन आत्महत्या केल्याच्या घटनेला विराम मिळत नाही तोच स्थानिक जुनी कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या वारीसपुरा येथे आईसोबत भाड्याने राहत असलेल्या एका तरुणाने अज्ञात कारणावरून घरातील शौचालय बाथरूम च्या प्लंबिंग पाईप ला दुपट्ट्याने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना आज पहाटे 5 वाजता निदर्शनास आली असून मृतक तरुणाचे नाव शहबाज मजिद पठाण वय 24 वर्षे रा वारीसपुरा कामठी असे आहे.

प्राप्त माहितीनुसार सदर मृतक तरुण हा भंगार दुकानात मजूर म्हणून कार्यरत होता व मोठ्या भावाचे लग्न झाल्याने मोठा भाऊ पत्नी सह सैलाब नगर येथे वास्तव्यास आहे तर मृतक हा आईसोबत वारीसपुरा येथे जहिर रब्बानी आदिल यांच्या घरी भाड्याने राहत होता काल आईने मोठ्या भावाचे जेवण सांगल्यावरून मृतकाचा मोठा भाऊ पत्नीसह येऊन जेवण करून राहत्या घरी परतले तद्नंतर आई व मृतक हे

दोन्ही निवांत झोपल्यावरून रात्री 3 दरम्यान आई रजिया मजिद पठाण ला अचानक जाग आली असता सदर मृतक हा अंथरुणावर न दिसल्याने शोध घेतला मात्र कुठेही न दिसल्याने सैलाब नगर येथील मोठ्या भावाकडे माहिती दिली यावर मोठा भाउ सलमान पठाण याने वारीसपुरा चे घर गाठून शोध घेतला असता सदर मृतकाने घरातील शौचालय बाथरूम च्या प्लंबिंग पाईप ला गळफास लावून आत्महत्या केल्याचे निदर्शनास आले आत्महत्येचे कारण अजूनही कळू शकले नाही तर पोलिसांना मिळालेल्या माहितीवरून जुनी कामठी पोलिसांनी त्वरित घटनास्थळ गाठून घटनास्थळाचा पंचनामा करीत मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनार्थ येथील शासकीय उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले .पोलिसांनी यासंदर्भात आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास सुरू आहे.

संदीप कांबळे कामठी