Published On : Sat, Jul 27th, 2019

जयभीम चौकात इसमाची गळफास लावून आत्महत्या

कामठी :-स्थानिक नवीन कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या जयभीम चौकातील एका इसमाने घरात कुणी नसल्याचे संधी साधून घराच्या छताला कापडी लुंगी ने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना काल दुपारी 3 दरम्यान घडली असून मृतक इसमाचे नाव अनिल पंचकवडीदास कुरील वय 55 वर्षे रा जयभीम चौक कामठी असे आहे.

प्राप्त माहितीनुसार घरमंडळी मोलमजुरी करून दुपारी 3 वाजता घरी परतले असता सदर मृतक इसमाने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना निदर्शनास आल्याने एकच धक्का बसला असून आत्महत्येचे कारण अजूनही कळू शकले नाही.

घटनेची माहिती मिळताच नवीन कामठी पोलिसांनी घटनास्थळ गाठून घटनास्थळाचा पंचनामा करीत मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनार्थ येथील शासकीय उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले पोलिसांनी यासंदर्भात आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास सुरू आहे.

संदीप कांबळे कामठी