Published On : Fri, Feb 7th, 2020

प्रशिक्षणार्थी सैन्य जवानाची गळफास लावून आत्महत्या

कामठी :-स्थानिक जुनी कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या छावणी परिषद परिसरातील गार्ड रेजिमेंटल सर्व्हिस मध्ये प्रशिक्षण घेण्यास आलेल्या सैन्य जवानांने अज्ञात कारणावरून प्रशिक्षण संपण्याच्या शेवटच्या दिवशी अज्ञात कारणावरून केंट टिपू ट्रेनिंग कंपनीच्या मागील जंगलातील एका बाबळीच्या झाडाला पांढऱ्या रंगाच्या दुपट्ट्याने गळफास लावुन आत्महत्या केल्याची घटना आज 7 फेब्रुवारीला सकाळी साडे आठ दरम्यान निदर्शनास आली असून मृतक सैन्य जवानांचे नाव रामचंद्र पितांबर बेहरा वय 20 वर्षे रा बंगुलीया ओरिसा असे आहे.

पोलिसानी दिलेल्या माहितीनुसार सदर मृतक हा रिकृट म्हणून कामठी येथील जी आर सी मध्ये प्रशिक्षण घेण्यास आले असता प्रशिक्षण पूर्ण होण्याच्या आजच्या शेवटच्या दिवशी टिपू ट्रेनिंग कंपनीच्या निवासी स्थानाचे सर्व प्रशिक्षनार्थी आज सकाळी 8 च्या आधी उठून खोली साफ सफाई करून कचरा केंट टिपू ट्रेनिंग कंपनीच्या मागे असलेल्या जंगलात फेकायला गेले असता दूर अंतरावरील एका बाभळी च्या झाडाला एक इसम गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना निदर्शनास येताच सर्वांना धक्का बसला.

घटनेची माहिती जुनी कामठी पोलिसांना देताच पोलिसानी त्वरित घटनास्थळ गाठून घटनास्थळाचा पंचनामा करीत मृतदेह ताब्यात घेऊन नजीकच्या शासकीय उपजिल्हा रुग्णालयात मृतकाच्या पार्थिवावर शवविच्छेदन करण्यात आले. आत्महत्येचे कारण अजूनही गुलदस्त्यात असून पोलिसानी यासंदर्भात आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास सुरू आहे.

संदीप कांबळे कामठी