Advertisement
कन्हान : — सामाजीक बांधिलकी ची जाणी व असणारे आपणास समाजाचे काही देणे लागते या भावनेतून जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा माहुली चे सहाय्यक शिक्षक धनराज बोडे यांनी वाढदिवसाला शाळेत वृक्षारोपन करून विद्यार्थ्यांना नोटबुक वाटप करून आप ला वाढदिवस साजरा केला.
समाज कार्याची आवड असणारे बोडे सर दर वर्षीच आपला वाढदिवस अनोख्या पद्धतीने साजरा करतात. मागील वर्षी शाळेतील आईवडीलांचे छत्र हरवलेल्या विद्यार्थ्यांना गणवेश वाटप करून आप ला वाढदिवस साजरा केला होता.
नुकताच ५ फेब्रुवारी ला त्यांचा वाढदिवस झाला असून त्यांनी शाळेत स्वतःकडून वृक्षारोपन व शाळेतील विद्या र्थ्यांना नोटबुकचे वाटप केले यावेळी शाळेचे मुख्याध्यापक धनीराम निमकर, शिक्षक चंद्रशेखर मायवाडे, हेमलता जिभे आदींची उपस्थिती होती.
Advertisement