Published On : Thu, May 6th, 2021

जावयाच्या कलहातुन सासऱ्याची गळफास लावून आत्महत्या

कामठी :-स्थानिक नवीन कामठी पोलिस स्टेशन हद्दीत येणाऱ्या बाबा अब्दुल्लाहशाह दरगाह परिसरात दारूच्या नशेत असलेल्या जावयाने सासऱ्याला केलेल्या शिवीगाळ व अपमानास्पद वागणूकीतून मानसिक त्रास झालेल्या सासऱ्याने जावयाच्या या नेहमीच्या कलहाला कंटाळून घरी कुणी नसल्याची संधी साधून घराच्या छताला दोरीने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना आज 6 मे ला सायंकाळी 6 वाजता केली असून मृतक सासऱ्याचे नाव नाजीर शहा वय 57 वर्षे रा बाबा अब्दूल शाह दरगाह कामठी असे आहे

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी त्वरित घटनास्थळ गाठून घटनास्थळाचा पंचनामा करीत मृतदेह ताब्यात घेत मृतदेहाच्या पार्थिवावर शवविच्छेदन करण्याहेतु मृतदेह कामठी येथील शासकीय उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. पोलिसांनी तुर्तास आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास सुरू आहे.मृतकाच्या पाठीमागे पत्नी, 4 मुली व एक मुलगा असा आप्तपरिवार आहे.