कामठी :-जगाच्या पातळीवर निवडणुकीत अनेक देशांनी कोरोना प्रतिबंधक लसीकरण केल्याने त्या देशात कुठल्याही प्रकारचा कोरोना राहिलेला नाही अशी परिस्थिती आपल्या देशासह, महाराष्ट्रात व कामठी मौदा विधानसभा क्षेत्रात निर्माण करण्यासाठी लोकांमध्ये लसीकरणाची जनजागृती वाढवणे गरजेचे आहे.
तर ही जनजागृती वाढवण्यासाठी ज्याप्रमाणे निवडणूक काळामध्ये घरोघरी जाऊन गावातील राजकीय पक्षाचे नेते मत मागतात त्याप्रमाणे प्रशासनाने तसेच येथील लोकप्रतिनिधी व नगरसेवकांनी आपापल्या प्रभागात घरोघरी जाऊन लस घेण्याचे फायदे समजावून सांगून लसीकरणाला वेग द्यावा असे आव्हान कांग्रेस चे महाराष्ट्र प्रदेश महासचिव व नागपूर जिल्हा परिषद चे माजी अध्यक्ष सुरेशभाऊ भोयर यांनी आज प्रभाग क्र 10 येथील दुर्गादेवी नगर स्थित हनुमान मंदिर सभागृहात आयोजित दोन दिवसीय कोरोना प्रतिबंधक लसीकरण कार्यक्रम प्रसंगी व्यक्त केले. याप्रसंगी नगरसेवक काशिनाथ प्रधान, हरीश माहुरे आदी उपस्थित होते.
प्रभाग क्र 10 चे नगरसेवक काशिनाथ प्रधान यांच्या नेतृत्वात दुर्गादेवी नगर, हनुमान मंदिर सभागृहात आयोजित दोन दिवसीय कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत प्रभागातील बहुससंख्य नागरिकांनी कोरोना प्रसतिबंधक लसीकरण करून कोरोनाला ठरविण्यासाठी खऱ्या कोरोना योदधाची भूमिका साकारली.
