Published On : Mon, Aug 5th, 2019

कर्जाला कंटाळून सोनार तरुणाची गळफास लावून आत्महत्या

कामठी :-कामठी तालुक्यांतर्गत येणाऱ्या भिलगाव येथील कॅनल कामठी रोड वरील फ्लॅट नंबर 102 सुंदरम अपार्टमेंट रहिवासी एका स्वर्णकार तरुणाने व्यावसायिक कामानिमित्त गावातील एका तरुणांकडून 50 हजार रुपये उधारी स्वरूपात घेतले होते या रकमेची परतफेड व्याजाच्या स्वरूपात 85 हजार रुपये देणे होते मात्र आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्याने व्याजासह उधारीची रक्कम परत करने शक्य होत नव्हते या कारणावरून साहूकार हा नेहमी आर्थिक त्रास देत शिवीगाळ देत मारहाण करीत असल्याने या जाचक त्रास तसेच कर्जाला कंटाळून कर्जदार सोनार तरुनाणे विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना नुकतीच घडली असून मृतक तरुणाचे नाव आदित्य विनोद भुताड वय 29 वर्षे रा भिलगाव ता कामठी असे आहे.

या प्रकरणात यशोधरा नगर पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करीत आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या आरोपी साहूकार तरुणाबद्दल भादवी कलम 306 अनव्ये गुन्हा नोंदविण्यात आला असून आरिपीचे नाव प्रणय गायकवाड रा. भिलगाव ता कामठी असे आहे.

Gold Rate
24 Oct 2025
Gold 24 KT ₹ 1,23,400 /-
Gold 22 KT ₹ 1,14,800 /-
Silver/Kg ₹ 1,51,600/-
Platinum ₹ 60,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सदर मृतक तरुणाचे भिलगाव गावातच सोने चांदी विक्रीचे दुकान असून व्यावसायिक कामानिमित्त सदर आरोपिकडुन काही महिन्यापूर्वी 50 हजार रुपये उधार घेतले मात्र व्यवसायात असलेल्या मंदीमुळे व आर्थिक कमजोरी मुळे उधारिचे पैसे घेणे परत होत नव्हते तर दुसरीकडे आरोपी प्रणय गायकवाड हा नेहमी 50 हजार रुपये उधारी व त्यावरील व्याज असे एकूण 85 हजार रुपयांच्या मागणीसाठी अश्लील शिवीगाळ देत मारझोड करून मानसिक त्रास देणे हे नित्याचेच झाले होते या जाचक त्रास व कर्जाला कंटाळून कर्जदार अविवाहित तरुणाने राहत्या घरातच कोणत्यातरी विषारी औषध प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला असता त्याला तडकाफडकी कामठी च्या आशा हॉस्पिटल मध्ये उपचारार्थ दाखल करण्यात आले होते मात्र परिस्थिती नाजूक असल्याने उपचारार्थ नागपूर च्यामेडिकल इस्पितळात हलविण्यात आले दरम्यान तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला होता.

मृतकाच्या पाठीमागे आई , वडील, एक भाऊ व एक बहीण असा आप्तपरिवार आहे. तर या आत्महत्या प्रकरण तपासात निष्पन्न झालेल्या कारणावरून फिर्यादी मृतकाचा भाऊ शुभम विनोद भुताड वय 26 वर्षे रा भिलगाव कामठी ने स्थानिक पोलीस स्टेशन ला दिलेल्या तक्रारीवरून आरोपी प्रणय गायकवाड विरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला असून आरोपी अजूनही अटकेबाहेर आहे .

Advertisement
Advertisement