रामटेक: ताई गोळवलकर महाविद्यालयात “पावसाळी राणभाज्या महोसव “चे नुकतेच आयोजन करण्यात आले होते . पावसाळयात,शेतात व जंगलात अनेक वनस्पति उगवतात ,यातील काहिंचा आपन राणभाच्या म्हणून वापर करतो ,या राणभाज्या अरोग्या साठी उपयुक्त असतात.कारण त्यात मोठ्या प्रमाणतात जीवनसत्व ,खनिज द्रव व शरीराला पौष्टिक आवश्यक औषधी गुणधर्म ही असतात .
या साठी या वनस्पतिची ओळख ,त्यांच्या उपयोग व त्यांचे गुणधर्म चा बाबतीत प्राथमिक माहिती असण गरजेच आहे .असा मोलाचा सल्ला प्राचार्य राजेश शिंगरू यानी आपल्या अध्यक्षीय भाषणातून दिला .
ताई गोळवलकर महाविद्यालया मध्ये वनस्पती विभागा तर्फ ,विभागाप्रमुख प्राध्यापिका स्वतन्त्रता शर्मा कामदार यांच्या विशेष सहकार्याने बी एस सी द्वितीय वर्षाच्या विद्यार्थांनी “पावसाळी रानभाज्या महोत्सवाचे “आयोजन केले होते . हयावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष व उद्धाटक महाविद्दालयाचे प्राचार्य राजेश शिंगरू होते.कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरीता सर्व विधार्थी व कर्मचाऱ्यांनी उपस्थीती दर्शवुन सहेयाग दिला.
कधी न पाहिलेल्या रानभाज्याची ओळख प्राचार्य राजेश शिंगरू यांनी करवून दीली . विद्यार्थ्याना ह्यावेळी शास्त्रशुद्ध माहिती मिळाली तसेच त्यांचा आस्वाद सुधा घेता आला. हा अनुभव विद्यार्थांकरीता अविस्मरणीय ठरला .ह्यावेळी विद्यार्थ्यांना रानभाज्या बद्दल महिती अवगत करून दिल्या बद्दल विद्यार्थ्यांनी स्वतंत्रता शर्मा कामदार यांचे आभार मानले .









